संगणकाद्वारे मिळणार ध्यान यज्ञाचा लाभ

93

पुणे : पिरॅमिड स्पिरीच्युअल सोसायटी  मूव्हमेंट तर्फे ऑन लाईन डिजिटल ध्यान यज्ञाचे रविवार दि. 10 मे रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळात आयोजन करण्यात आले आहे. घर बसल्या या ध्यान यज्ञाचा लाभ संगणकाद्वारे मिळणार आहे, अशी माहिती सोसायटीचे साधक राजेश खेले यांनी दिली.

या कार्यक्रमाचे उदघाटन पितामह  ब्रम्हर्षी सुभाष पत्रीजी यांच्या हस्ते होईल. चित्रपट, नाट्य अभिनेत्री स्मिता जयकर या महिला सबलीकरण, श्रेयस डागा हे ध्यानधारणा, रंगनाथ नाईकडे हे जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा सकारात्मक दृष्टिकोन,  श्री व सौ. भामरे हे कोरोना व्हायरस, राजेश खेले हे बाल योगीचे महत्व, श्री व सौ . किरण तानपाठक हे हिलींग थेरपी, अनंता ओम या भौतिक जगापलीकडील जीवनाचे महाद्वार, अवनी राव या तपस्येचे महत्व, पल्लवी देशमुख या महाअवतार बाबाजीं बरोबरचा प्रवास या विषयांवर  मार्गदर्शन करणार आहेत.

ध्यान धारणा करणाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खेले यांनी केले.