यूपीएससी प्रिलिम्स परीक्षा पुढे ढकलली

114

नवी दिल्ली : संघ लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा प्राथमिक परीक्षा पुढील सूचना येईपर्यंत तहकूब करण्याचा निर्णय घेतला आहे. यूपीएससी प्रिलिम  परीक्षा 31 मे रोजी होणार होती. यूपीएससीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले कि, २० मे  नंतर परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल. अरविंद सक्सेना यांच्या अध्यक्षतेखाली संघ लोकसेवा आयोगाची सोमवारी बैठक झाली.

बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊन वाढविल्यानंतर हा निणर्य घेतला आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देशात परीक्षा घेणे शक्य नसल्याचे आयोगाच्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. प्रीलिम्ससाठी परीक्षेत कोणतेही नवीन बदल करण्यात आले नाहीत. मात्र, देशातील परिस्थितीचे मूल्यांकन केल्यावर पुढील परीक्षेच्या तारखा कळवण्यात येणार आहे. पुढे बोलताना अधिकारी म्हणाले कि २० मे नंतरच पुढील निर्णय विद्यार्थ्यांना कळवण्यात येईल.

दरम्यान, देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक परीक्षा केंद्र क्वारंटाईन सेंटरमध्ये बदलण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थाना अडचणीचा सामना करावा लागला असता म्हणून आयोगानं परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या आठवड्यात  विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉलटिकिट देण्यात येणार होत मात्र , सध्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.