पुण्यातुन मुळ गावी जाण्याची विद्यार्थ्यांना परवानगी द्यावी : आकाश मस्केपाटील

242

मोफत बसेस ची सोय ऊपलब्ध करावी

जशी कोटा मधील विद्यार्थ्यांची सरकारने ज्या तत्परतेने व्यवस्था करुन त्यांची स्वग्रही परतन्याची सोय सरकारने बसेस च्या माध्यमातुन करुन त्यांना ज्यांच्या त्यांच्या मुळ गावी पोहच केले. तसेच अगदी त्याच प्रमाणे पुण्यातुन मुळ गावी जाण्यार्यांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात आहे त्यातही जास्त करुन विद्यार्थ्यांचा भरणा जरा जास्तच आहे व सोबतच ईतरां चाही आहे त्यामुळे पुण्यात व ईतर ठिकाणी अडकलेल्या विद्यार्थी व ईतरांना त्यांच्या मुळ गावी जाण्याची परवानगी देऊन त्यांची वाहुतुकीची मोफत बसेस ची सोय ऊपलब्ध करुन द्यावी व सोबतच फ्री मेडीकल चेक अप व्यवस्था करावी अशी मागणी राज्य सरकार कडे शिवसंग्रामचे शहरपाध्यक्ष आकाश मस्केपाटील यांनी फॅक्स , ईमेल व प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

कारण यातील बर्याच जणांकडे स्वत: ची वाहन व्यवस्था नसल्यांमुळे किंवा स्वत:चे वाहन नसल्यामुळे त्यांची आर्थिक पिळवणुक होऊ शकते व कमालीची अडचण होण्याची शक्यता आहे.

तरी या संपुर्ण विद्यार्थी व ईतरांना लवकरात लवकर परवानगी मिळावी व त्यांची योग्य तपासणी व पुर्व ती काळजी घेऊन मोफत प्रवासाची व्यवस्था करावी व त्यांची बाबत तातडणीने निर्णय घ्यावा अशी मागणी व विनंती शिवसंग्राम विद्यार्थी आघाडी पुणे चे शहरपाध्यक्ष आकाश दा मस्केपाटील व अविनाश खापे, शैलेश सरकटे, बाळासाहेब चव्हाण, प्रकाश खैरे, सुयश गलांडे, अक्षय घोडके, ओमकार पुजारी अक्षय रणसिंग, राजवैभव वाघ, प्रविण पवार, आकाश शिंदे यांनी केली आहे.