गुडरिक ग्रुपकडून पुण्‍यामध्‍ये सुरू असलेल्‍या महामारीदरम्‍यान स्‍थलांतरित लोकांना मदतीचा हात

109

पुणे : सध्‍या सुरू असलेल्‍या महामारीदरम्‍यान गरजू लोकांना मदतीचा हात पुढे करण्‍याचा मनसुबा कायम ठेवत गुडरिक ग्रुप या पूर्व भारतातील लोकप्रिय चहा ब्रॅण्‍डने पुण्‍यामध्‍ये स्‍थलांतरित कामगारांना देण्‍यात आलेल्‍या रेशन पॅकेजेसचा भाग म्‍हणून शहरात वाटपासाठी ४०० किग्रॅ चहा दान केली आहे.

देशव्‍यापी लॉकडाऊनमुळे विविध उद्योगांचे कार्यसंचालन थांबले आहे आणि वंचित लोकांवर या लॉकडाऊनचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. गुडरिक ग्रुपने सेंटर फॉर एन्‍व्‍हायरोन्‍मेंट एज्‍युकेशन, पुणेसोबत सहयोगाने समाजातील अशा लोकांसाठी मदतीचा हात पुढे करत त्‍यांना त्‍यांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यामध्‍ये मदत केली आहे. जवळपास एक महिन्‍यापूर्वी सुरू झालेल्‍या या उपक्रमाने पुण्‍यातील अंदाजे १२०० कुटुंबांना यशस्‍वीरित्‍या साह्य केले आहे आणि देशव्‍यापी लॉकडाऊन सुरू असेपर्यंत हा उपक्रम स्‍थलांतरित लोकांना मदत करण्‍याचे कार्य सुरूच ठेवणार आहे.

गुडरिक ग्रुप लिमिटेडच्‍या ग्राहक विभागाचे उपाध्‍यक्ष व व्‍यवसाय प्रमुख श्री. पीटी कृष्‍णन म्‍हणाले, ”सध्‍या सुरू असलेल्‍या महामारीचा आपल्‍या समाजावर मोठा प्रतिकूल परिणाम झाला आहे. कंपनी स्‍थानिक संस्‍थांशी हातमिळवणी करत प्रदेशांतील असहाय्य आणि सर्वाधिक परिणाम झालेल्‍या लोकांना मदत करत आहे. एक जबाबदार ब्रॅण्‍ड म्‍हणून आम्‍ही लोकांना मदत करत राहू आणि या महामारीदरम्‍यान त्‍यांची काळजी घेऊ.”

गुडरिकने कोलकाता व मध्‍यप्रदेश अशा प्रमुख प्रांतांमध्‍ये वंचित लोकांच्‍या आरोग्‍याची काळजी घेण्‍यासाठी अशाच प्रकारचे प्रयत्‍न सुरू केले आहेत. कोलकातामध्‍ये कंपनीने पश्चिम बंगालच्‍या जिल्‍हा आरोग्‍य संचालनालयासोबत सहयोग जोडला आणि या सहयोगाच्‍या माध्‍यमातून कोविड-१९ महामारीदरम्‍यान मदत केली जात आहे. तसेच त्‍यांचे कर्मचारी व चहा लागवड करणा-या कामगारांसाठी स्‍वच्‍छता राखण्‍यासंदर्भात विविध जागरूकता प्रशिक्षण उपक्रम राबवले आहेत. मध्‍यप्रदेशातील खिरकिया येथे गुडरिक ग्रुपने त्‍यांच्‍या स्‍थानिक वितरण भागीदारासोबत सहयोग जोडत देशव्‍यापी लॉकडाऊनदरम्‍यान वंचितांसाठी दररोज आवश्‍यक वस्‍तूंचा पुरवठा केला आहे. या चहा कंपनीने अशा आव्‍हानात्‍मक काळामध्‍ये समाज आणि त्‍यांच्‍या कर्मचा-यांचा उत्‍साह वाढवत सेवा देऊ शकणारे व सहाय्यक असे उपक्रम राबवण्‍याचा निर्धार केला आहे.