Video : बालकलाकरही म्हणतायंत घरात बसा

216

पुणे प्रहार आयोजित ‘घरिच रहा, कोरोना टाळा’ उपक्रमात सहभाग

पुणे (प्रतिनिधी) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे प्रहारने सामाजिक बांधिलकी जपत सर्वांना घरीच राहण्याचे आवाहन केले. परंतू काही समाज बांधव कोरोना सारख्या विषाणूला आम्ही घाबरत नाही अस सांगून प्रशासनाला न जुमानता बिनदास्तपणे बाहेर वावरताना दिसतात.
हेच लक्षात घेऊन पुणे प्रहारने ‘घरित रहा, कोरोना टाळा’ उपक्रमाअंतर्गत सामाजिक संदेश देत जनजागृतीचा एक छोटासा प्रयत्न केला. या प्रयत्नाचा अनेक माध्यमातून कौतुक होताना दिसत आहे.

अद्वैत राईलकर आणि अनिश राईलकर ह्या दोघांनी दि. 20 एप्रिल रोजी पुणे प्रहारच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह जनजागृती केली. आम्हीही घरात बसून कंटाळलोय पण आम्ही घराबाहेर पडत नाही, घरात आई-बाबांशी मजामस्ती करतो. तुम्हीही घरात रहा, बाहेर जावू नका असं त्यांनी सांगितलं.

अनेक प्रश्नांवर भाष्य करत त्यांनी काही नाटके, गाणी तसंच डान्सही करून दाखविला.

याआधी या उपक्रमात अभिनेता सुभाष यादव (मराठी चित्रपट रोल नंबर 18, कॉमेडी तडका फेम), अभिनेता योगेश पवार (फॅशन कोरियोग्राफर), अभिनेता आर.जे.सुमित (रेड एफ.एम, औरंगाबाद), अभिनेत्री नेहा बाम (मराठी, हिंदी चित्रपट) मेकअप आर्टिस्ट क्षमा धुमाळ, आकाशवाणी मुंबई आर.जे. पुर्णिमा शिंदे यांनी सहभाग नोंदविला होता.

अद्वैत राईलकर आणि अनिश राईलकर यांनी दिलेल्या सामाजिक संदेशाचं अनेक स्तरात कौतुक होत आहे.

पुणे प्रहार – शब्दधार यांनी वर पोस्ट केले सोमवार, २० एप्रिल, २०२०