ही मराठी अभिनेत्री सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाली, मला आपलं म्हणा!

127

मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमा, विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी आज आघाडीची अभिनेत्रीच्या यादीत गणली जाते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. .तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. तेजस्विनीने नुकताच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.

या फोटोत तेजस्विनी साडी नेसून एका दिव्याकडे बघते आहे. या फोटोसोबत तेजस्विनीने #मलाआपलंम्हणा. असा हॅशटॅग दिला आहे. तेजस्विनीच्या या फोटोवर चाहत्यांसह मराठी सेलिब्रेटींनीदेखील कमेंट्स आणि लाईक्स केले आहेत. लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून सगळ्यांनीच आपली पसंती दर्शवली आहे.