महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याची मुख्यमंत्र्यांनी दाखवली तयारी

414

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन वाढण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. या विषयी फैसला आता मोदींच्या हातात असल्याचे समजते आहे.

आजच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. त्यानुसार राज्यातील लॉकडाऊन वाढण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. लॉकडाउन हटविण्याबाबतचा निर्णय सरसकट संपूर्ण देशासाठी घ्यावा, तो टप्प्याटप्प्याने हटवायला नको अशी सूचना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. अरविंद केजरीवाल यांच्या या सूचनेला उद्धव ठाकरेंसोबत इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पाठिंबा दिला.

महाराष्ट्राला विविध पातळ्यांवर केंद्राची मदत लागणार आहे. केंद्राने मदत करून सहकार्य करावे, अशी विनंती उद्धव यांनी मोदींकडे केली. तसंच मोदींनीही त्यांना मदतीचं आश्वासन दिलं.

घाईत लॉकडाऊन हटवल्यास घातक परिणाम : डब्लूएचओ

डब्लूएचओचे प्रमुख टेड्रोस एडहानोम यांनी जिनिवामधील पत्रकार परिषदेत म्हटलं की, “लॉकडाऊन हटवावं अशी सगळ्यांसारखीच आमचीही इच्छा आहे. परंतु घाईने लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतला तर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होती. जर आपण योग्य पद्धतीने कोरोना व्हायरसचा सामना केला नाही तर त्याचे घातक परिणाम होतील.”