गेल्या तीन वर्षात जाहीर झालेल्या ‘लक्झरी’ घरांपैकी अर्धी ग्राहकअभावी पडून; नव्या योजनांना खीळ

104

प्रॉपटायगर डॉट कॉमच्या अहवालातील निरीक्षण  

पुणे : भारतातील नऊ प्रमुख शहरात उच्चभ्रू घरांच्या मागणीत काहीही सुधारणा होण्याची चिन्हे नसून गेल्या तीन वर्षात एकूण उपलब्ध घरांपैकी अर्धी घरे अजूनही विकली गेलेली नाहीत, असे प्रॉप टायगर डॉट कॉम या घरबांधणी क्षेत्राशी संबंधित सल्लागार कंपनीने म्हटले आहे. येत्या काळात उच्चभ्रू घरांच्या नव्या योजनांनाही खीळ बसणार असल्याचेही कंपनीने ने संकलित केलेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.

प्रॉपटायगर डॉट कॉम हे इलारा टेक्नॉलॉजीज च्या मालकीचे रिअल इस्टेट पोर्टल आहे. हाउसिंग डॉट कॉम आणि मकान डॉट कॉम ही वेब पोर्टलही याच कंपनीची आहेत. प्रॉपटायगर डॉट कॉम ने संकलित केलेल्या माहितीनुसार २०१६ ते २०१९  या तीन वर्षात ७ कोटी रुपये आणि अधिक किमतीची ११३१ घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली आणि त्यापैकी ५७७ (५१ टक्के) जानेवारी २०२० पर्यंत विकली गेली नव्हती. याच काळात ५ कोटी रुपये ते ७ कोटी रुपये किमतीची ३६५६ घरे उपलब्ध झाली; मात्र त्यातील ५५ टक्के घरे शिल्लक आहेत आणि ३-५ कोटी रुपये किमतीच्या ८५०३ घरांपैकी ५६ टक्के घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.

‘लक्झरी’ घरांना प्रतीक्षा ग्राहकांची 

किंमत ९ प्रमुख शहरांत मार्च २०२० पर्यंत शिल्ल्लक  घरे
रु. १-३ कोटी ५१,९९७
रु. ३ -५ कोटी ४७६२
रु. ५ -७ कोटी २०२५
रु. ७ कोटींहून अधिक ५७७

 

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत यापैकी सर्वात जास्त म्हणजे ३००१५ शिल्लक घरे आहेत, तर त्याखालोखाल हैदराबाद (८५५४) आणि बंगळुरू (५७९४) यांचा क्रमांक लागतो.

२०१७ पासूनची आकडेवारी पहिली तर अशा उच्चभ्रू घरांच्या नव्या योजना बाजारात येण्याचे प्रमाण कमी होत चाललेले दिसते.  उदा., १-३ कोटी रुपये गटात २०१८ मध्ये २९९९६ घरे विक्रीसाठी आली तर २०१९ मध्ये ही संख्या २९७७५ वर घसरली. तसेच ५-७ कोटी रुपये गटात २०१९ मध्ये ८५९ घरे उपलब्ध झाली जी २०१८ मध्ये १५३६ होती, मात्र  ३-५ कोटी रुपये गटात २०१८ मध्ये २६७५ घरे तर २०१९ मध्ये ३०९२ घरे विक्रीसाठी आली.

“सध्याच्या आर्थिक मंदीचा घरबांधणी क्षेत्राला जबरदस्त फटका बसला आहे. यामुळे इतर श्रेणीतील घरांप्रमाणेच उच्चभ्रू घरांच्याही मागणीत घाट झाली आहे. नोटबंदीमुळे उच्चभ्रू घरांची मागणी रोडावली आणि त्यात अजूनही सुधारणा झालेली नाही. सध्या सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या साथीमुळे २०२०-२१ या वर्षीही उच्चभ्रू घरांसह एकूणच घरांच्या मागणीत होत राहील,” असे  हाउसिंग डॉट कॉम, मकान डॉट कॉम आणि प्रॉपटायगर डॉट कॉम या तिन्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ध्रुव आगरवाला म्हणाले. मात्र अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाची किंमत आणखी घसरली तर अनिवासी भारतीयांकडून उच्चभ्रू घरांना मागणी येऊ शकेल असे श्री  ध्रुव आगरवाला , ग्रुप सीईओ, हाऊसिंग डॉट कॉम, मकाण डॉट कॉम आणि प्रॉपटीगर डॉट कॉम. म्हणाले.

“भारतीय चलन अमेरिकन डॉलर च्या  तुलनेत  ७७ रुपये प्रति डॉलर पेक्षाही खाली गेले होते. यामुळे अनिवासी भारतीयांना उच्चभ्रू घरांची खरेदी हि एक आकर्षक गुंतवणूक वाटू शकेल, ” असे श्री आगरवाला पुढे म्हणाले.

या आकडेवारी च्या संदर्भातील पाहणी अहमदाबाद (गांधीनगर सह), बंगळुरू, चेन्नई, गुरुग्राम (भिवादी, धारुहेरा आणि सोहाना सह) हैदराबाद, कोलकाता, मुंबई (नवी मुंबई आणि ठाणे सह ) पुणे, आणि नोयडा (ग्रेटर नोयडा, नोयडा एक्स्टेन्शन आणि यमुना एक्स्प्रेस वे सह) या शहरांमध्ये करण्यात आली.