औरंगाबादमध्ये दोन कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण

124

औरंगाबाद (अनिकेत घोडके) :

औरंगाबाद घाटी रुग्णालयात दाखल असलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्याचे खळबळ उडाली आहे. बुधवारी या दोघांचेही नमुने कोरोना संशयित असल्याने पुणे येथील ‘एनआयव्ही’ कडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पुण्याच्या एनआयव्हीमधून आलेल्या अवहाला नुसार त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक विभागाने सांगितले. घाटी रुग्णालया मध्ये मंगळवारी १३८ लोकांची तपासणी करण्यात आली होती.

त्यात काहींना कोरोनासारखी लक्षणे आढळून आली. कोरोनासारखी लक्षणे आढळून आलेल्या ९ जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घाटी  रुग्णालयात घेण्यात आले होते.यामधील नमुने घेतलेल्या सात जनांचा अहवाल निगेटिव्ह आला. तर अन्य दोन जणांचे अहवाल जाहीर करण्यात आले नव्हते. जास्त कोरोना संशयित म्हणून त्यांच्या लाळेच्या नमुन्याची पुणे येथील ‘ एनआयव्ही’ला येथे पुन्हा तपासणी करण्यात आली.

येथून प्राप्त अहवालावरून त्यांना कोरोना झाल्याची पुन्हा मिळालेल्या माहिती आहे.एक महिला आणि एक पुरुष पुण्याहून औरंगाबाद शहरात आले होते. पुरुष हा पुण्यातील आयटी कंपनीत आहे.कोरोनाची लागण झालेला एक रुग्ण पुणे येथे आयटी अभियंता आहे, तो  काही दिवसांपूर्वीच शहरात परत आला  होता. तर दुसरा रुग्ण एक महिला आहे, तिचा पती नुकताच दिल्ली येथून परतला होता. दरम्यान, तिच्या पतीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यांची परत चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.