जि. प. प्रशालेत शालेय पोषण आहार वाटप

90

सिल्लोड  प्रतिनिधी : अरविंद मुरकुटे

सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथील प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार वाटप करण्यात आला.

गेल्या अनेक दिवसापासून देशासह राज्यात कोरोना या विषाणू जन्य आजाराने थैमान घातले असून त्यामुळे शासनाने कठोर पावले उचलत संसर्ग रोखण्यासाठी शाळा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र शिक्षण विभागाने घेतला.यामुळे विदयार्थ्यांना दररोज शाळेत दिला जाणारा पोषण आहार तांदूळ, कडधान्ये यापासून विदयार्थी वंचित राहत असल्यामुळे उरलेला साठा सम प्रमाणात वाटप करण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झाले.

त्या आदेशानुसार  मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली 100 विदयार्थ्यां पैकी 90 विदयार्थ्यांना त्यांचा पालकांना बोलावून रीतसर नोंद घेऊन आहार वाटप करण्यात आले.

हे वाटप करत असताना वरिष्ठ स्तरावरून आलेल्या आदेशावरून सद्य स्थिती ची काळजी घेत 1 मिटर अंतरावर वर्तुळ आखून, प्रत्येक पालकांनी मास्क, रुमाल तोंडाला लावूनच शाळेत येण्यासंर्भात सूचना देण्यात आल्या होत्या . आहार वाटप करतेवेळी सहशिक्षक  संजय चिकटे,  शा. समिती अध्यक्ष सुदाम बाबुराव कदम उपस्थित होते.