स्विगी आणि झोमॅटोने जीवनावश्यक वस्तूंच्या होमडिलिव्हरीसाठी पुढाकार घ्यावा

236

आज राज्यात कोरोनाचा प्रसार जितक्या तीव्रतेने चोहोबाजूंना पसरत आहे हे दिवसेंदिवस मीडियाच्या माध्यमातून आपण सर्व नागरिक पाहतच आहोत. एकंदरीतच कोरोनाची लागण असलेल्या व्यक्तीकडून त्याचा संसर्ग कम्युनिटी च्या स्वरूपात तो इतरांपर्यंत अप्रत्यक्षपणे पोहोचत आहे.

देशात आणि राज्यात लाॅकडाऊन, संचारबंदी या सारखे आदेश असले तरीदेखील सामान्य लोक ही सातत्याने भाजीपाला अन्नधान्य दूध औषधे यासारख्या जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी घराच्या बाहेर दैनंदिन पडत आहेत आणि त्यामुळे कोरोनाचा संहार करण्याचे एक मोठे उद्दिष्ट मात्र कुठेतरी यशस्वी होत नसताना दिसून येत आहे. लोकांनी कितीही सोशल डिस्टंसिंग मेंटेन करण्याचा व तसे समुपदेशन करण्याचा विचार केला तरीसुद्धा हे नियम सर्रासपणे धाब्यावर बसताना दिसून येत आहे आणि म्हणूनच कुठेतरी या सगळ्या लोकांनी कोणत्याही गोष्टीसाठी घराबाहेर पडू नये अशी जर व्यवस्था याठिकाणी करण्यात आली तर एक मोठं पाऊल कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने पडू शकते, आपले ध्येय साध्य होण्याच्या दृष्टीने होऊ शकते.

स्विगी आणि झोमॅटो या कंपन्या सातत्याने होम डिलिव्हरी करण्यामध्ये पारंगत आहेत. कोणताही अन्नपदार्थ हा थेट त्या घरापर्यंत पोहोचविण्या मध्ये यांचे डिलिव्हरी बॉईज अत्यंत पारंगत आहेत आणि त्यामुळेच आज त्या कंपन्यांनी एक नोबेल काॅससाठी पुढे येऊन जर हे सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतला तर ख-या अर्थाने लाॅकडाऊन व संचारबंदी चे वैशिष्ट्य पुर्ण होईल व आपण मोठ्या प्रमाणात या कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यशस्वी होऊ शकतो.

आणि म्हणूनच या सर्व अन्नधान्य भाजीपाला दूध औषधे सारख्या जीवनावश्यक वस्तू होम डिलिव्हरी च्या माध्यमातून घरपोच करण्याची जबाबदारी स्वीकारावी या कंपन्यांनी स्विकारावी असे एक आवाहन मी याठिकाणी या कंपन्यांना करत आहे आणि राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांना मी विनंती करतो की या अशा होम डिलिव्हरी कंपन्यांना या माध्यमातून लोकांच्या जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचे नियोजन आखण्यास सूचना करून सोसायटीत समाजात सोशल डिस्टंसिंग मेंटेन करून व या सर्वातून कोरोनावर मात करण्याचे आपले उद्दिष्ट सफल करण्यासाठी प्रयत्न व्हावेत.