कोरोणा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड जिल्ह्याच्या सीमा बंद

448

शेख ताहेर

बीड जिल्ह्यात कोणा विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा बीड पोलीस प्रशासनाकडून तंतोतंत बंद करण्यात आल्या आहेत ???

राज्यात राज्य शासनाने 13 मार्च 2020 पासून कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातरोग प्रतिबंधक कायदा1897 लागू केला आहे त्याप्रमाणे जिल्हाधिकारी बीड यांनी या कायद्यातील खंड 2,3,4, या तरतुदीच्या अंमलबजावणी करिता आदेश जारी केले आहे. तसेच राज्यात क्रिमिनल प्रोसिजर कोड(CRPC) कलम 144 लागू करण्यात आले असून दि,24-03-2020 रोजी रात्री00:00 ते 14-04-2020 रोजीच्या मध्यरात्री 24:00 पर्यंत नागरी, ग्रामीण, औद्योगिक क्षेत्रात जमाबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली आहे

पुवरील नियमावलीच्या तरतुदीनुसार जिल्ह्यात गर्दी टाळण्यासाठी व(crpc) 144 आदेशाचे उल्लंघन होऊ नये या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सक्षम प्राधिकारी मा जिल्हाधिकारी साहेब यांनी बीड जिल्ह्याच्या सीमा सील/ बंद करण्यात येत आहेत असे दि,27-03-2020 रोजी आदेशित केले आहे.

वरील आदेशानुसार पोलिस प्रशासनाने बाहेरच्या जिल्ह्यातून बीड मध्ये येणारे मुख्य रस्त्यावर 14 शेख नाके तयार केले आहेत यावर 24 तास पोलिस तैनात करून बीड जिल्ह्यात कोणीही येणार नाही व कोणीही बाहेर जाणार नाही यासाठी करडी नजर ठेवून सीमा/ बंद केल्या आहेत.

तरी असे निदर्शनास आले की मुख्य रस्त्या व्यतीरिक्त सीमा लगत च्या छोट्या गावामधून कच्चा रस्त्याच्या मार्गाने लोक जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करून प्रवेश करीत आहे आणि नियमाचे उल्लंघन करत आहे यावर उपाय योजनात्मक पाऊल म्हणून पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी समन्वयातून सीमेलगत 15 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमधून जिल्ह्यात प्रवेश करणारे रस्ते खोदून किंवा मुरूम माती टाकून पूर्णपणे बंद केली आहे.

असेच जिल्ह्याच्या सीमेलगत भागातील 15 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 41 गावाच्या हद्दीतील बाहेरच्या जिल्ह्यातून येणारे कच्चे व निम्न पक्के स्वरूपाचे सर्व रस्ते बंद करून बीड जिल्हा भीमा सीलबंद करण्यात आले आहेत
तरी नागरिकांना पोलीस प्रशासनातर्फे आव्हान करण्यात येते की कोणीही बीड जिल्ह्यात पोलिस प्रशासनाच्या परवानगीशिवाय प्रवेश करू नये तसेच केल्यास त्या संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल.