ग्रामपंचायत व अधिकारी यांच्या उदासीन धोरणामुळे ग्रामस्थांचे आरोग्य रामभरोसे

123

नेकनूर( प्रतिनिधी)

जगात कोरोनाने हाहाकार घातला असताना प्रत्येक स्थरातून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी विविध प्रकारच्या उपाय योजना राबविल्या जात आहेत,परंतु नेकनूरची ग्रामपंचायत मात्र स्वच्छते पासून कोसो दूर राहणारी नेकनूर ग्रामपंचयत मात्र काहीच उपाययोजना राबवताना दिसत नाही त्यामुळे ग्रामपंचायत व अधिकारी यांच्या उदासीन धोरणामुळे ग्रामस्थांचे आरोग्य रामभरोसे म्हणण्याची वेळ आली आहे.

तालुक्यातील नेकनूर ग्रुप ग्रामपंचायत सर्वात मोठी ग्रामपंचयत असून नेकनूर, सावंतवाडी व वैतागवडी या गावाचा कारभार नेकनूर येथून चालतो.पण नेकनूर मधेच काही उपाय योजना राबवण्यात आल्या नाहीत तर इतर गावांचे काय? असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. येथील ग्रामविकास अधिकारी उपलब्ध होत नसल्याचे आरोप ग्रामस्थातून होत आहे.त्यामुळे नागरिक आपली नाराजी सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसत आहेत.

कोरोना विषाणूचा प्रसाररस्ते रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून गावातील रस्ते निर्जंतुकीकरनासाठी ग्रामपंचायत च्या वतीने सोडियम हायपोक्लोरिक सोलूशनची फवारणी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच बाहेरून आलेल्या लोकांचा सर्वे करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले जाते परंतु अशा मदतनीस मात्र सर्वे करताना दिसत नसल्यामुळे आकडेवारी बरोबर आहे का? ती चुकीची असल्याची गावात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.तरी ग्रामविकास अधिकारी व प्रशासनाने नियुक्त केलेले अधिकाऱ्यांनी वेळ राहता योग्य त्या उपाय योजना राबवाव्यात आणि ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी एवढीच ग्रामस्थांची अपेक्षा आहे.