बीड जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या पंडित मौलवी व धर्मगुरूंचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

762

शेख ताहेर : देशात तसेच राज्यात (covid-19) कोरोनाव्हायरस साथीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याबाबत केंद्र तथा राज्य शासनाने दिलेल्या सूचनांनुसार सामान्य जनता एकत्र येणार नाही व व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दि,23,03,2020 रोजी सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यासाठी तिथे लोक एकत्र येऊ नये यासाठी शासनाने आवाहन केले होते.

शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देताना बीड जिल्ह्यातील मौलवी, पंडित, धर्मगुरूंनी शासनाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन धार्मिक स्थळी सामुदायिक प्रार्थना किंवा नमाज पठण इ. घेणे पूर्णपणे बंद केले. त्यांच्या या प्रतिसादामुळे पोलीस प्रशासनाचे काम सोपे झाले. मा. पोलीस अधीक्षक श्री हर्ष.ए. पोद्दार यांनी अशा सर्व मौलवी व पंडित यांना पोलिस प्रशासनाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरव करून आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य केले बाबत आभार व्यक्त करून त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे बीड जिल्ह्यातील एकूण 28 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 108 मान्यवरांना हे प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे.

वरील सर्व कारवाही मा. पोलीस अधीक्षक श्री हर्ष ए पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपाधीक्षक, व ठाणे प्रभारी अधिकारी यांनी पूर्ण केली आहे.