दुकानदारांनो खबरदार : किराणा माल चढ्या दराने विक्री कराल तर कारवाई  : तहसिलदार चंद्रकांत शेळके

341

कारवाईसाठी पुरवठा विभागाकडे जबाबदारी : संपर्क करण्याचे अवाहन

पैठण : किरण काळे :

कोरोना व्हायरस ने जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता देशभरात लाॅकडाऊन केले आहे.हीच संधी साधून पैठण तालुक्यातील अनेक गावातील दुकानदार जादा दराने माल विक्री  करत असल्याने ग्राहकांची चांगलीच लूट होताना दिसत आहे.दुकानदारांनो खबरदार

किराणा माल चढ्या दराने विक्री कराल तर कारवाईला सामोरे जा असा इशारा पैठणचे कर्तव्यदक्ष तहसिलदार चंद्रकांत शेळके यांनी दुकानदारांना दिला आहे.कारवाईची जबाबदारी तहसिल पुरवठा विभागाकडे देयात आली असुन नागरिकांनी संपर्क करण्याचे अवाहनही तहसिलदार शेळके यांनी केले आहे.

पैठण तालुक्यातील अनेक गावात दुकानदार चढ्या भावाने किराणा मालाची सर्रासपणे विक्री करत असल्याची माहिती मिळताच यासंदर्भात पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके

यांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन अन्नधान्य पुरवठा विभागाची तातडीची बैठक बोलवून चढ्या भावाने किराणा माल विक्री करणाऱ्या दूकानदारावर विशेष लक्ष ठेवाण्याचे आदेश तहसिल पुरवठा विभागाला दिले आहेत.कोरोना च्या पार्श्वभूमीवर देशभरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व लाॅकडाऊन करण्यात आले आहे.ग्राहक किराणा माल खरेदी करताना दुकानदार चढ्या भावाने विक्री करत असल्याची धक्कादायक माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना मिळाली आहे.तहसीलदार यांनी दुकानदार यांना तंबी देत, म्हणाले की,दुकानदारानो संचारबंदी चा फायदा घेऊन ग्राहकांची लूटमार कराल तर कार्यवाही करण्यात येईल असेही तहसीलदार शेळके यांनी सांगितले.किराणा माल चढ्या भावाने विक्री होत असेल तर नायब तहसीलदार कमल मनोरे मो.नं. 9175461993, अव्वल कारकून बालाजी कांबळे  मो.नं. 8600281408,अव्वल कारकून नितीन जाधव मो.नं.9730813099 या नंबरवर त्वरित संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी असे जाहीर आवाहन तहसीलदार शेळके यांनी ग्राहकांना केले आहे.

प्रतिक्रिया :

तर… दुकानदारांचा परवाना रद्द करणार : 

पैठण शहरासह तालुक्यातील दुकानदार जर नागरिकांना अशा परिस्थितीत चढ्या दराने माल विक्री करत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही.नागरिकांनी खरेदी केलेल्या मालाचे पक्के बिल घेणे गरजेचे आहे.दुकानदार जर चढ्या दराने मालाची विक्री करत असेल तर नागरिकांनी पुराव्यासह आमच्या तहसिल पुरवठा विभागाशी संपर्क साधावा दुकानदारांचा परवांना रद्द करून कारवाई करण्यात येईल.

  • कमल मनोरे, नायब तहसिलदार, पुरवठा विभाग तहसिल, पैठण