कोरोना विषाणुच्या लढाईत प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून लढते वन्यजीव सेवाभावी संस्था

587

अकोले : कोरोना विषाणुने जगाला विळखा घातल्याने या जीवघेण्या अजाराच्या विरोधात सर्वच स्तरातून जनजागृती व प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात खेड्यापाड्यात सुद्धा जनजागृती व्हावी यासाठी  वन्यजीव संवर्धन सेवाभावी संस्था प्रयत्न करत आहे.

अकोले तालुक्यातील कोतुळ येथील संजय ठिकेकर,गोकुळ साबळे,जुबेर शेख ,महेश पवार, भागवत खोल्लम, किरण जाधव,आदित्य पवार,अजय खरात,शंकर घोलप,जुनेद शेख ,फरीद सयद,या तरुण  प्रयत्न करतआहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या सर्व प्रशासकीय यंत्रणेच्या बरोबरीनेच संपूर्ण अकोले तालुक्यात या संस्थेच्या वतीने जनजागृती केली जात आहे.

कोरोना विषाणूच्या संकटामुळे सर्व देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे.सर्व उद्योग व्यापार व अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. लोकांनी घरातच थांबावे व स्वतःला सुरक्षित ठेवावे यासाठी सरकारच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. असे असुनसुद्धा काही लोक या आपत्ती कडे गांभीर्याने पहात नाहीत. विनाकारण रस्त्यावर फिरणे, गर्दी जमवणे, सरकारी यंत्रणेला सहकार्य न करणे अशी अनेक उदाहरणे गावोगावी पहायला मिळत आहेत. याविषयी जनजागृती व्हावी, लोकांनी सरकारी नियम पाळावेत यासाठी वन्यजीव संवर्धन संस्था ग्रामीण भागात मोठ्या नेटाने काम आहे.

गाडीला स्पीकर लावून गावोगाव फिरून. कोरोना वर मात करण्यासाठी लोकांना जागृत करत आहे. या महान संकटाच्या काळात वन्यजीव संवर्धन संस्था अकोले तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेसाठी देवदूतासारखे काम करत आहे.