देशव्यापी लॉकडाऊनच्या काळात सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) पाळण्याच्या दृष्टीने ई-कॉमर्स आणि सरकारी यंत्रणांचे परस्परसहकार्य

227

अभूतपूर्व पेचप्रसंगाच्या या काळात कोव्हिड१९चा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्यांतील सरकारांनी अनेक पावले उचलली आहेत२१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची नुकतीच झालेली घोषणा हे आणखी एक स्वागतार्ह पाऊल असून त्याने प्रभावित होणाऱ्यांनीही या उपाययोजनेचे कौतुकच केले आहे.

खासगीसरकारी भागीदारीची वेळ

काही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांत काही व्यत्यय आल्यामुळे काही भागांमध्ये ईकॉमर्स सेवांच्या डिलिव्हरींवर परिणाम पाहायला मिळालामात्रत्यानंतर सगळ्या गोष्टींना सकारात्मक वळण मिळाले आहेसरकार आणि राज्य पातळीवरील स्थानिक यंत्रणांनी लॉकडाऊनच्या काळात ईकॉमर्स सुरू राहण्यासंदर्भात अतिशय गरजेचे असलेले स्पष्टीकरण जाहीर केले असून या आदेशाअंतर्गत किराणा माल आणि अत्यावश्यक मालाची डिलिव्हरी करण्यास परवानगी असल्याचे स्पष्टपणे सूचित केले आहे.

फ्लिपकार्टअॅमेझबिगबास्केटग्रोफर्सझोमॅटोस्विगी आणि इतरांना याबाबतीत आश्वस्त करण्यात आले आहे की, त्यांच्या पुरवठासाखळीला आणि डिलिव्हरी कर्मचाऱ्यांना स्थानिक कायदे अमलबजावणी यंत्रणांकडून सुरक्षित आणि सुरळीत मार्ग उपलब्ध करून दिला जाईलया आश्वासनामुळे यातील बहुतेक कंपन्यांनीखासकरून किराणा माल आणि अत्यावश्यक वस्तू पोहोचवणाऱ्या कंपन्यांनी आपल्या सेवा पुन्हा सुरू केल्या आहेत.

ग्राहक एकमेकांमध्ये सामाजिक अंतर राखत असताना अशा काळात ईकॉमर्स जी भूमिका बजावू शकतोत्याची प्रोत्साहनपर दखल भारताने घेतली आहेफ्लिपकार्टसारख्या कंपन्या कर्मचारीखासकरून डिलिव्हरी एग्झिक्युटिव्ह आणि ग्राहकांसाठी सुरक्षित आणि निर्विघ्न पद्धतीने पुरवठासाखळी बळकट करीत आहेत.

काही श्रेणींमधील मागणी सुरूच राहण्याची शक्यता असून फ्लिपकार्टने पुरवठासाखळीच्या आणि डिलिव्हरीच्या अंतिम टप्प्याच्या सुरक्षिततेसाठी सर्व आस्थापना आणि डिलिव्हरी वाहने (किराणा मालासाठीयांच्या नियमित निर्जंतुकीकरणाच्या माध्यमातून बहुविध प्रतिबंधात्मक उपाय योजले आहेतविक्रेत्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात पुरेशा प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात यादृष्टीने त्यांना शिक्षित आणि प्रोत्साहित करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

डिलिव्हरी एग्झिक्युटिव्हजचे आत्मबळ कायम ठेवण्यासाठी

या आव्हानात्मक काळामध्ये पुरवठा साखळीतील कर्मचारी आणि डिलिव्हरी भागीदार यांची कार्यनिष्ठा आणि ग्राहक सर्वोपरि हे ब्रीद फारच कौतुकास्पद आहेअत्यावश्यक उत्पादनांच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी सर्व आव्हानांवर मात करून ग्राहकांना सेवा पुरवण्याच्या आपल्या कटिबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला आहेपरिस्थितीनुसार वाढणाऱ्या मागणीनुसार पुरवठा करणे ही ईकॉमर्सची जबाबदारी आहे, असा त्यांचा विश्वास असून भारतभरातील ग्राहकांच्या गरजा भागवण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.

फ्लिपकार्टसारख्या कंपन्या या काळात निव्वळ कर्मचाऱ्यांना शिक्षितच करत नाहीततर त्यांना प्रोत्साहनपर परतावाही देत आहेतएकीकडे फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी एग्झिक्युटिव्हजचा आरोग्यविमा आणि जीवनविमा उतरवण्यात आला असून त्याचबरोबर त्यांना क्वारंटाइन करावे लागले तर त्या दिवसांचा पूर्ण पगार दिला जाणार आहे.

जगभरात कोव्हिड १९विरोधी लढ्यातील लॉकडाउनमध्ये तंत्रज्ञानाचे बळ मिळालेल्या ईकॉमर्सने सरकारी यंत्रणांचे जोडीदार म्हणून कळीची भूमिका बजावली आहेभारतीय ईकॉमर्स कंपन्याही कोरोनाविरोधी लढाईतील या पेचप्रसंगाच्या काळात निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करून केंद्र आणि राज्य सरकारला पाठबळ देण्यासाठी वचनबद्ध आहेत.