‘एनबीए’चे चेअरमन प्रा. डॉ. के. के. अगरवाल यांच्या हस्ते सूर्यदत्ता महाविद्यालयाला (एससीएमआयआरटी) उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

163

पुणे : सूर्यदत्ता कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, इन्फर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजीला (एससीएमआयआरटी) ‘मोस्ट प्रॉमिसिंग हायर एज्युकेशन कॉलेज ऑफ द इयर २०२०’ पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे इंटिग्रेटेड चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने आयोजित ‘नॅशनल एज्युकेशन एक्सलन्स कॉनक्लेव्ह’मध्ये ‘एससीएमआयआरटी’ला २०१९-२० या वर्षातील सर्वोत्तम उच्च शिक्षण संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिएशनचे (एनबीए) चेअरमन प्रा. डॉ. के. के. अगरवाल यांच्या हस्ते सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया व सहायक प्राध्यापक आर. आर. संचेती यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे झालेल्या या परिषदेला विविध विद्यापीठे, उद्योग संस्था आणि केंद्र सरकारच्या अनेक मान्यवर प्रतिनिधींची उपस्थिती होती. प्रसंगी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट रिसर्चचे (आयआयएचएमआर) कुलगुरू प्रा. डॉ. पंकज गुप्ता, कॉन्संट्रेक्सचे वरिष्ठ संचालक कमलेन्दु बाली, प्रेस्टिज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन डॉ. देवेश जैन, ‘सीबीएसई’चे संचालक बिस्वजीत साहा, मलेशियातील लिंकन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. अमिया भौमिक आदी उपस्थित होते.

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “विद्यार्थी-शिक्षकांच्या गरजेनुसार प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाते. तसेच विविध कार्यशाळा, कार्यक्रमांना आमच्या येथील शिक्षक जात असतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित ‘एससीएमआयआरटी’मध्ये विविध शाखेतील बीबीए अभ्यासक्रम, बीएस्सी ऍनिमेशन यासह दोन पदव्युत्तर अभ्यासक्रम २००४ पासून शिकवले जात असून, तीनही वर्षाचे मिळून १५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अद्ययावत अभ्यासक्रम, तज्ञ्ज शिक्षक, उद्योगधारित प्रशिक्षण दिले जाते. गुणवतेबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान असलेले अभ्यासक्रम विद्यार्थ्याना शिकवले. भारतीय मूल्यांना पाश्चात्य दृष्टिकोनासोबत गुंफून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी मिळवून देणे आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण संस्था म्हणून नावारूपास येणे या उद्दीष्टाने संस्था काम करत आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे ही पुरस्काररूपी पोचपावती आहे. या यशात संस्थेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे आहे.”

“येणाऱ्या काळात तंत्रज्ञानामुळे अनेक बदल होणार आहेत. हे नाविन्यपूर्ण बदल स्वीकारून येणाऱ्या आव्हानांना संधी म्हणून पाहिले पाहिजे. विद्यार्थ्यानी स्वअध्ययन करण्यासह २१ व्या शतकातील कौशल्य आत्मसात करावीत. ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्या क्षेत्रातील आव्हानाना सामोरे गेले पाहिजे. ऍटोमेशन, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्यातून मार्ग काढून पुढे जावे,” असेही डॉ. संजय चोरडिया यांनी नमूद केले.