‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस’ च्या वतीने पोलीस अधिकारी, अग्निशमन दल, स्वच्छता कामगार आणि कर्मचारी वर्ग यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप 

315

पुणे : शहर ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस’ च्या वतीने कोथरूडमधील शास्त्रीनगर मुख्य पोलिस स्टेशनमधील पोलीस अधिकारी व कर्मचारी, अग्निशमन दल कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी वर्ग यांना कोरोनापासून बचाव उपयुक्त मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस’, पुणे शहरचे सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी सामाजिक कर्तव्याच्या जाणिवेतून हे वाटप केले.

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) कीरण बालवडकर यांनी (कोरोना व्हायरस) जागरूक आणि सतर्कतेचे आवाहन केले. उगाच घाबरून न जाता स्वछतेचे पालन करा असे सांगितले. स्वच्छता कामगारांना या मास्कची विशेष गरज आहे. ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस’ने हे मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले त्याबाबत आभार व्यक्त केले.

(कोरोना व्हायरस) या विषाणूच्या प्रादुर्भावाने संपूर्ण जगाला ग्रासलेले असताना पुण्यात देखील दुर्दैवाने त्याचा परिणाम मोठ्या स्वरूपात जाणवत आहे. अशावेळी वैद्यकीय सेवा, सेना, पोलीस, अग्निशमन दल कर्मचारी, स्वच्छता कामगार आणि इतर अत्यावश्यक सेवा कर्मचारी सतत आपल्या संरक्षणासाठी उभे असतात. त्यांच्या प्रती आदर आणि सन्मान व्यक्त करण्याचा हेतू या वाटपामागे आहे, असे गिरीश गुरनानी यांनी सांगितले. ते बजावत असलेल्या प्रामाणिक कर्तव्याबाबत त्यांचे आभार देखील मानण्यात आले.