अभ्यासासह खेळही महत्वाचा : न्या धोपरे

100

पुणे : विद्यार्थ्यांनी औपचारिक अभ्यासक्रमांसह। क्रीडा क्षेत्रात सहभाग घेऊन स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे, असे आवाहन निवृत्त जिल्हा न्यायाधीश चांनाप्पा धोपरे यांनी केले.

टेंडर स्टेप्स प्री स्कुलच्या वार्षिक क्रीडा दिनाचे उद्घाटन धोपरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी यावेळी राष्ट्रीय ऑलिम्पिक पटू पराग पाटील, राष्ट्रीय हॉकी खेळाडू निशा सराफ, निवृत्त प्रा रेखा सावकार, उद्योजक श्रीकांत मनधना आदी मान्यवर उपस्थित होते.

या क्रीडादिनानिमित्त बनी रेस, बिन बॅग बॅलन्स रेस, सर्किट तसेच नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थी व पालक यांच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रवी हजारे, विशाल कलमकार, संकेत सराफ यांनी विशेष परिश्रम घेतले.