इंडिगोने केली एचडीएफसीसोबत भागीदारी

89

खिशात पैसे खुळखुळणं कोणाला नाही आवडत? आणि… खरेदी करणं आणि या सगळ्यातून विमान खर्चाचे पैसे मिळवणं तर आणखीनच आनंददायी! यासाठी आता प्रतिक्षा करण्याची गरज नाही. इंडिगो या भारतातील आघाडीच्या विमानसेवा कंपनीने आज भारतातील आघाडीच्या एचडीएफसी बँकेच्या साह्याने मास्टकार्ड समर्थित ‘का-चिंग’ हे त्यांचे क्रेडिट कार्ड सादर केले आहे.

6E रीवॉर्ड्स आणि 6E रीवॉर्ड्स XL या दोन प्रकारच्या क्रेडिट कार्डांमुळे विविध फायद्यांसह अधिक संपन्न असा प्रवासानुभव मिळेल आणि कार्डधारकांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर अतुलनीय असे रीवॉर्ड्सही मिळतील.

ग्राहकांना कार्डानुसार 1500 रुपयांची आणि 3000 रुपयांची मोफत तिकिटे मिळतील. ग्राहकांना इंडिगोसोबतच्या व्यवहारांवर 6E रीवॉर्डस वापरता येतील. ग्राहकांना आमच्या फिचर पार्टनरसह डायनिंग, मर्कंडाइज, वाहतूक, मेडिकल, सलोन्स इ. वर अतिरिक्त 10-15 टक्के रीवॉर्ड्सही मिळवता येतील. शिवाय, प्राधान्यक्रमाचे चेक-इन, सीटची निवड आणि मोफत जेवण असे लाभही मिळतील.

मास्टरकार्ड समर्थित का-चिंग कार्डवर तब्बल 14 प्रवास आणि लाइफस्टाईल लाभही आहेत. यात लाऊंजची सुविधा, जागतिक तज्ज्ञांकडून मोफत वैद्यकीय सल्ले, भारतातील काही उत्कृष्ट गोल्फ कोर्सवर गोल्फ खेळण्याचे स्वातंत्र्य अशा सुविधांचा समावेश आहे. कार्डधारकांना मास्टरकार्ड हॉटेल सुविधा, एअरपोर्ट लिमोझीन सेवेचा लाभ घेता येईल आणि प्रीमिअम लाभांसह हॉटेल, कार रेंटल आणि विमान तिकिटांवर बचत करता येईल.

या सादरीकरणाबद्दल इंडिगोचे चीफ कमर्शिअल ऑफिसर श्री. विल्यम बोल्टर म्हणाले, “आमचे ग्राहक इंडिगोमधून प्रवास करत असताना त्यांना नेहमी संस्मरणीय आणि सहजसुंदर अनुभव देणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. ‘का-चिंग’च्या सादरीकरणामुळे आमची ही बांधिलकी अधोरेखित झाली आहे. आमच्या ग्राहकांना विमान तिकिटांचे बुकिंग, हॉटेलमधील जेवण, मनोरंजन आणि इतर खर्चांवर 6E रीवॉर्ड्स पॉईंट देऊन ते पॉईंट्स इंडिगो विमान तिकिटांमध्ये बदलण्याची सोय करून देताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही जे काही करतो त्यात ग्राहक समाधान केंद्रस्थानी असते आणि अगदी प्रत्येक दिवशी आमच्या ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देणे हाच आमचा प्रयत्न आहे. प्रचंड व्याप्ती असलेले आमचे भागीदार एचडीएफसी आणि मास्टरकार्ड यांच्यामुळे हा आत्मविश्वास आणखी वाढला आहे आणि त्यातून आमच्या ग्राहकांना अनोखा अनुभव देत इंडिगोचे नेटवर्क आणि व्याप्ती वाढेल. ही एक सुयोग्य भागीदारी आहे. कारण, इंडिगो, एचडीएफसी आणि मास्टरकार्ड या सगळ्यांचाच ग्राहकांना सातत्याने उतकृष्ट सेवा देण्यावर आणि अप्रतिम ग्राहकानुभव देण्यावर भर राहिला आहे.”

“आमच्या ग्राहकांच्या सतत बदलणाऱ्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रवासातील परिपूर्ण पर्याय असलेले का-चिंग हे कार्ड सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. एक लाइफस्टाईल बँक म्हणून प्रत्येक भारतीयाला वापरण्यास सोपे, प्रचंड रीवॉर्ड्स देणारे आणि त्यांच्या गरजांनुरुप तयार केलेले उत्पादन देण्यावर आमचा विश्वास आहे. ग्राहकांना फक्त इंडिगो विमानेच नाही तर खरेदी, हॉटेलात जेवणे आणि वाणसामान अशा खरेदीवरही अधिकाधिक रीवॉर्ड्स पॉईंट्स मिळावेत या पद्धतीने या कार्डची रचना करण्यात आली आहे. हे पॉईंट्स इंडिगो विमान तिकिटे आणि प्रवासातील इतर लाभांसाठी वापरता येतील. आमचे हे को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आमच्या वाढत्या उत्पादन यादीतील एक मौल्यवान भर असेल आणि त्यामुळे प्रवास हा खऱ्या अर्थाने लाभ मिळवून देणारा होईल, असा आम्हाला विश्वास आहे,” असे एचडीएफसी बँकेच्या पेमेंट सोल्युशन्स आणि मार्केटिंगचे कंट्री हेड श्री. पराग राव सादरीकरणाच्या वेळी म्हणाले. “इंडिगो आणि मास्टरकार्ड या आपापल्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांसोबत ग्राहकांना अप्रितम मूल्य देण्याचा हा प्रवास सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. ”

या भागीदारीबद्दल मास्टरकार्डचे दक्षिण आशियातील डिव्हिजन प्रेसिडंट पौरुष सिंग म्हणाले“को-ब्रँडेड कार्ड विभागात आघाडीवर असलेल्या मास्टरकार्डला इंडिगो या भारतातील सर्वात मोठ्या एअरलाइन आणि एचडीएफसी या भारतातील सर्वात मोठ्या खासगी बँकेसोबत ‘का-चिंग’ कार्ड सादर करताना आनंद होत आहे. भारतीयांच्या प्रवासाच्या संकल्पना यातून बदलणार आहेत. संशोधनानुसार, भारतीय आणि विशेषत: तरुण पिढी वारंवार प्रवास करते, देशातही आणि देशाबाहेरही. ते सहजसुंदर ग्राहकानुभव, उत्कृष्ट रीवॉर्ड्स देणारे आणि जागतिक दर्जाची सुरक्षा मानांकने असणाऱ्या सेवा पर्यायांचा शोध घेत असतात. सेवाप्रदाता आता वेगाने भारतात आणि परदेशात वाढणाऱ्या आणि अनोख्या प्रवास क्षेत्रासाठी डेटा आणि माहितीवर आधारित सुयोग्य असे रीवॉर्ड्स देऊ शकतील.”

ठळक वैशिष्ट्ये
6E रीवॉई्स XL·         अॅक्टिव्हेशनवर 3000 रुपयांची मोफत विमान तिकिटे·         6E प्राइम (प्राधान्यक्रमाचे चेक-इन, सीटची निवड आणि मोफत जेवण)·         इंडिगो व्यवहारांवर 5 टक्के 6E रीवॉर्ड्स·         जेवण, मनोरंजन आणि वाणसामान खरेदीवर 3 टक्के 6E रीवॉर्ड्स·         इतर सर्व गैर-इंडिगो व्यवहारांवर (इंधन आणि वॉलेट वगळता) 2 टक्के 6E रीवॉर्ड्स·         फीचर पार्टनर व्यवहारांवर 15 टक्क्यांपर्यंत 6E रीवॉर्ड्स·         आठ डोमेस्टिक विमानतळ लाऊंजची मोफत सुविधा·         इंधन सरचार्जवर एक टक्का सूट·         प्रत्येक विभागात कन्व्हेअन्स फीवर 100 रु. सवलत 6E रीवॉर्ड्स·         अॅक्टिव्हेशनवर 1500 रुपयांची मोफत विमान तिकिटे·         6E प्राइम अॅड-ऑन (प्राधान्यक्रमाचे चेक-इन, सीटची निवड आणि मोफत जेवण)·         इंडिगो व्यवहारांवर 2.5 टक्के 6E रीवॉर्ड्स·         जेवण, मनोरंजन आणि वाणसामान खरेदीवर 2 टक्के 6E रीवॉर्ड्स·         इतर सर्व गैर-इंडिगो व्यवहारांवर (इंधन आणि वॉलेट वगळता) 1 टक्के 6E रीवॉर्ड्स·         फीचर पार्टनर व्यवहारांवर 10 टक्क्यांपर्यंत 6E रीवॉर्ड्स·         प्रत्येक विभागात कन्व्हेअन्स फीवर 100 रु. सवलत·         इंधन सरचार्जवर एक टक्का सूट