रेड एफएमचा नवीन शो  रेनबो डायरीस अब नॉर्मल है

83

पुणे 25 फेब्रुवारी 2020: रेड एफ एम, भारतातील सर्वात मोठा, लोकप्रिय आणि सर्वाधिक अवॉर्ड विजेता म्हणून नावाजलेला खाजगी रेडिओ नेटवर्क घेऊन येत आहेत एक नवीन रेडिओ शो, जो एलजीबीटीक्यूआय  कम्युनिटी बद्द्ल जागरूकता निर्माण करेल. रेनबो डायरीस- अब नॉर्मल है आणि या शो चे सूत्रसंचालन करणार आहेत पुण्याची आवडती रेडिओ जॉक जोडी मॅन्डी आणि कबीर. रेनबो डायरीस एक असा शो आहे ज्यामध्ये  एलजीबीटीक्यूआय कम्युनिटीच्या संघर्षाची त्यांच्याबद्दल असलेले लोकांचे मत, आणि कम्युनिटी च्या यशाबद्दलची कहाणी ऐकवली जाईल . हा शो दर शुक्रवारी सादर होईल ज्यामध्ये कम्युनिटी आयकॉन्स , एक्सपर्ट्स आणि त्यांच्या यशोगाथा यांच्यासाठी व्यासपीठ निर्माण केलं जाईल.

या शो लाँच च्या निमित्ताने, निशा नारायणन, सीओओ अँड  डायरेक्टर, रेड एफ एम आणि मॅजिक एफ एम म्हणाल्या एलजीबीटीक्यूआय ची भारतातील सद्यपरिस्थिती बघता, लोकांना या कम्युनिटी बद्दल जागरूक करण्याची खूप गरज होती आणि आम्ही तो विडा उचलला. ‘रेनबो डायरीस -अब नॉर्मल है’ सारख्या शो च्या मागची संकल्पना होती कि लोकांमध्ये या कम्युनिटी बद्दल असलेले गैरसमज दुर व्हावे आणि कम्युनिटी बद्दल होणारी चर्चा नॉर्मल असावी. कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो आणि त्यामध्ये पत, पार्श्वभूमी, किंवा यश मध्ये येता कामा नये, आमची अशी आशा आहे कि या शो द्वारे जास्तीतजास्त लोक पुढे यावेत, आपली कहानी शेयर करावी आणि एकमेकांना सहाय्य्य करावं. आमचा उद्देश हाच आहे कि एक सर्वसमावेशक, एकमेकांना उत्तेजन देत करुणेची भावना जपणारे आणि प्रगतिशील असा समाज तयार व्हावा”

रेनबो डायरीस मध्ये आपल्याला बरेच सेगमेंट आहेत जसे मेंडी कबीर का हेल्पडेस्क ज्या मध्ये कॉऊन्सेलर च्या मदतीने नैराश्यावर मात करण्याबद्दल चर्चा केली जाईल,तर डोन्ट हाईड शो प्राईड मध्ये प्रसिद्ध गे पर्सनॅलिटी सोबत चर्चा करण्याची संधी मिळेल. #नो फिल्टर हा डायल इन सेगमेंट असेल तर ‘लव्ह at फर्स्ट स्वाईप’ हा कम्युनिटी मधील प्रोपोसलं, ऍप स्टोरीस आणि प्रेम कथे बद्दल असेल. रेनबो डायरीस-अब नॉर्मल है शो दर शुक्रवारी फक्त ९३. रेड एफ एम पुणे वर ऐकता येईल.