आरक्षण सद्यस्थितीबाबत धनगर समाजाचा महामेळावा

93

पुणे | महाराणी अहिल्यादेवी समाजप्रबोधन मंच, पुणे आणि मुंबई शाखेच्या वतीने धनगर आरक्षणाबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याच्या सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी रविवार दि १ मार्च रोजी संध्याकाळी ६ वा. शिवपार्वती सभागृह, गोकुळनगर, कोंढवा येथे महामेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष सनदी लेखापाल सोपानराव काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष अशोक शेजाळ, सदस्य तुकाराम काळे, पुणे शहराध्यक्ष गोकुळ वरकडे, सचिव दत्तात्रय सोलकर, वैचारिक शाखेचे राम गावडे, प्रबोधनचे ईश्वर ठोंबरे उपस्थित होते.

या महामेळाव्याचे उद्घाटन न्यायालयीन लढ्याचे प्रणेते व माजी पोलीस महासंचालक मधुकर शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

संघटनेने धनगर आरक्षणासाठी सन २0१६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आतापर्यंत ३३ वेळा सुनावणी झाली आहे. महामेळाव्यात या न्यायालयीन लढाईची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

या महामेळाव्याला धनगर समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शेजाळ यांनी केले.