परवडणे, कनेक्टिव्हिटी आणि गुणवत्ता हे नॅनो हाउसिंगचे प्रमुख आधारस्तंभ आहेत : डॉ. सुरेश हावरे

166

महत्वाकांक्षी ‘‘सर्वांसाठी घरं’’ या उपक्रमांबद्दलच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करीत प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. सुरेश हावरे यांनी आज मुंबईतील नॅनो हाऊसिंगवरील त्यांच्या नवीन पुस्तकाचे अनावरण माननीय श्री. नितीन गडकरी, रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री, मायक्रो, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार, श्री विनोद तावडे, महाराष्ट्र सरकारचे माजी शिक्षणमंत्री व श्री. मंगल प्रभात लोढा, लोढा समूहाचे संस्थापक, अध्यक्ष भाजपा मुंबई यांनी केले. डॉ. सुरेश हावरे यांनी लिहिलेल्या ‘नॅनो हाऊसिंग’ब्लूम्सबरी-युके द्वारा प्रकाशित पुस्तक भारतीय जनतेसाठी घरांच्या आव्हानांचे निराकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवते.

2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील सुमारे 60 दशलक्ष (6 कोटी) कुटुंबांना बाजारभावावर घरे परवडणार नाहीत. सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे, हे सरकार आणि धोरणकर्ते यांच्यासमोरील एक महत्त्वाचे आव्हान आहे. नॅनो हाऊसिंगचे उद्दीष्ट सर्वांसाठी परवडणारे घर देण्याचे आहे, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख ध्येयांपैकी एक. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे पुस्तकाच्या अनुषंगाने, भारताची आर्थिक राजधानी मुंबईतील 40 टक्के पेक्षा जास्त कुटुंबे खूप दाटीवाटीच्या व गजबजलेल्या ठिकाणी राहतात.

नॅनो हाउसिंग संकल्पना ही ब्लू ओशन धोरणावर आधारीत मुंबई विद्यापीठाच्या व्यापक संशोधनाचा निष्कर्ष आहे आणि रिअल इस्टेटच्या वाढत्या किंमती आणि या क्षेत्रातील तळ गाठलेल्या मागणीला संभाव्य उत्तर आहे. या उत्तम रित्या रचना केलेल्या पुस्तकात शहर व ग्रामीण पातळीवरील भारताच्या घरांच्या मागण्यांचे सर्वंकष विश्लेषण तसेच धोरण स्तरावर व इतर भागधारकांना या विभागाच्या वाढीला पुन्हा चालना देण्याकरिता विचारांच्या शिफारशी दिल्या आहेत.

“मुंबईसारख्या शहरांमध्ये मालमत्तेच्या किमती गगनाला भिडल्यामुळे विस्तृत कार्पेट क्षेत्र (1 आरके, 1 बीएचके, 2 बीएचके, इत्यादी) नॅनो घरांची मागणी गेल्या काही वर्षांत विशेषत: मुंबई आणि एमएमआर प्रदेशात वाढली आहे. सहजपणे उपलब्ध होणारे आणि ईएमआय मध्ये परिवर्तीत होणाऱ्या कर्जाद्वारे किंमत वाढणारे नॅनो घर घेणे हा एक योग्य पर्याय असल्याचे दिसते. माझ्याद्वारे लिखित नॅनो हाऊसिंग या विभागाच्या सर्वपैलूंचा समावेश करते, संभाव्य नॅनो घर खरेदीदारांना मार्गदर्शनाची सुविधा प्रदान करते.” असे डॉ. हावरे उद्घाटन प्रसंगी म्हणाले. हे पुस्तक गृहनिर्माणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, धोरणकर्ते, विद्यार्थी, आर्किटेक्ट, फायनान्सर आणि इतर सर्वांसाठी उपयुक्त आहे.

नितीन गडकरी, रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणाले, “भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील सध्याच्या किंमतीतील वाढ लक्षात घेता, देशातील लोकसंख्येचा एक मोठा हिस्सा घरे विकत घेऊ शकत नाही. भारतामध्ये या क्षेत्रातील वाढीचे पुढील चक्र आरामदायकतेने नाही तर परवडण्याने पुढे जाणार आहे. येत्या काही वर्षांत, आम्ही गुणवत्तेशी तडजोड न करता घरांच्या किंमती कमी करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासहित एक परिसंस्था विकसित करण्यावर आक्रमकपणे भर देऊ.”

याशिवाय पुस्तकामध्ये पूर्ण क्षमतेने न वापरल्या गेलेल्या भाड्याने घर देण्याच्या गोष्टीवरही विचार केला गेला आहे आणि ह्यावर प्रकाश टाकला आहे की 2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार केवळ महाराष्ट्रातच दोन दशलक्ष बंद मालमत्ता असून त्यापासून भाड्याने मिळणारे महत्त्वपूर्ण उत्पन्न मिळू शकले असते. त्याच बरोबर हे लक्षात घेतले पाहिजे की महाराष्ट्रातील घरांची तूट 19 दशलक्ष घरे आहे. याचा अर्थ ही बंद असलेली घरे जर राहण्यासाठी उपलब्ध करुन दिली गेली तर ती घरांच्या मागणीतील तूट बर्‍याच प्रमाणात दूर करेल.