केजरीवालांच्या शपथविधीला पंतप्रधान मोदी का होते गैरहजर?

236

आम आदमी पार्टीने दिल्लीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दुपारी १२ वाजता मुख्यंमत्रिपदाची शपथ घेतली. रामलीला मैदानावर झालेल्या या सोहळ्याला हजारो कार्यकर्ते, नेते उपस्थित होते. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र पंतप्रधान मोदी या सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत. त्याचं कारण काय? असा साऱ्यांना प्रश्न पडला आहे.

शपथविधी सोहळा झाल्यांनंतर जनतेला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रण दिलं होतं. मात्र ते व्यस्त असावेत. त्यामुळे ते येऊ शकले नाहीत.

सोहळ्यावेळी पंतप्रधान मोदी कुठे होते?

अरविंद केजरीवाल यांचा हा शपथविधी सोहळा दिल्लीत सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथे होते. त्यांचा हा दौरा पूर्वनियोजित होता. त्यामुळे ते येऊ शकते नसावेत. वाराणसी येथे त्यांनी जंगमवाडी मठाला भेट दिली. तेथे पूजाअर्चा केली. त्यानंतर ते जगतगुकरू विश्वराद्य गुरूकुल शतकोत्सव सोहळ्यासाठी गेले. तेथे त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले.