“पतंजली’तर्फे सूर्यनमस्कार दिन साजरा

107

पुणे  : पतंजली योग समिती, पुणेच्या वतीने रथसप्तमी व सूर्यनमस्कार दिनाचे आवचित्य साधून सूर्यनमस्कार घालण्याच्या कार्यक्रमाचे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारकात आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती पतंजलीचे पुणे जिल्या प्रभारी गोविद गाडगीळ यांनी दिली.

४३ साधकांनी ४३०० सूर्यानमस्कार घातले. तसेच अंगी तेज, ओज, दीर्घायुष्य व निरांतरता बाणावी यासाठी सूर्यनारायणाची प्रार्थना केली. सदर कार्यक्रमास कोथरूड विभाग प्रमुख सुषमा कालुरकर, कर्वेनगर विभाग प्रमुख देविदास तनपुरे, संयोजक प्रदीप शेटे, कमिका भौतिक आदी उपस्थित होते.

उत्तम आरोग्यासाठी रोज किमान १२ सुर्यानंमस्कार घालणे गरजेचे आहे, असे गाडगीळ यांनी नमूद केले.

सुर्यनमस्काराचे फायदे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्या साठी पतंजलीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असे प्रदीप शेटे यांनी सांगितले.