‘तान्हाजी’ अजय देवगणसाठी असाही लकी, ‘हा’ ठरला करिअरमधील सर्वात मोठा रेकॉर्ड!

189

अजय देवगण स्टारर ‘तान्हाजी’ सिनेमाची जादू बॉक्स ऑफिसवर 21 दिवसानंतर ही कायम आहे. ‘तान्हाजी’ने बॉक्स ऑफिसवर अजूनही आपली घौडदौड कायम ठेवली आहे. अजय देवगणच्या करिअरमधला सर्वात मोठा सिनेमा ठरला आहे. आतापर्यंत ‘तान्हाजी’ने 236 कोटींचा गल्ला जमावला आहे. तर वर्ल्डवाईड या सिनेमाने 312 कोटींची कमाई केली आहे.

अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ने त्याच्या गोलमालचा रेकॉर्ड तोडला आहे.

एवढेच नाही तर सिनेमा भारतात 300 कोटींची कमाई करण्याच्या दिशेने आहे. तर वर्ल्डवाईड हा सिनेमा 350 कोटींची कमाई करु शकतो असा अंदाज आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा अजय देवगणच्या करिअरमधला 100 सिनेमा आहे. अजयच्या गोलमालने वर्ल्डवाईड 308 कोटींची कमाई केली होती आणि ‘तान्हाजी’ने 312 कोटींची कमाई केली आहे.

‘तान्हाजी’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकले आहे. ‘तान्हाजी’ची अख्खी टीम या चित्रपटावर तब्बल तीन वर्षे खपत होती. चित्रपटातील अंगावर धावून येणारे युद्धाचे प्रसंग, साहस दृश्ये हे सगळे साकारण्यासाठी विदेशातील काही अ‍ॅक्शन डायरेक्टर बोलवण्यात आले होते. टीमची हीच मेहनत फळास आली, असे म्हणायला हरकत नाही.