भारतातील सर्वात मोठ्या कोरुगेटेड पॅकेजिंग मशिनरी एक्स्पो चे दिल्लीत आयोजन

पुणे, जानेवारी २०२४ : कोरुगेटेड पॅकेजिंग मशिनरी उद्योगाला समर्पित कोरु पॅक प्रिंट इंडिया एक्स्पो २०२४ चे ७ ते ९ मार्च दरम्यान दिल्लीत आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर येथे हा कार्यक्रम होईल. इंडियन पेपर कोरुगेटेड अँड पॅकेजिंग मॅन्युफॅक्च्युरर्स असोसिएशन (आयसीपीएमएआणि फ्युचरेक्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार असून भारतातील आघाडीच्या कोरुगेटेड पॅकेजिंग मशिनरी असोसिएशनतर्फे आयोजित एकमेव प्रदर्शन आहे.

या प्रदर्शनात कोरुगेटेड पॅकेजिंग क्षेत्रातील आघाडीचे उत्पादक आपल्या अत्याधुनिक यंत्राच्या थेट प्रात्यक्षिकांसह नावीन्यपूर्ण उत्पादने सादर करतील. पॅकेजिंग आणि कोरुगेटेड इंडस्ट्रीजची पूर्तता करणाऱ्या उत्पादनांचे सर्वसमावेशक प्रदर्शन सादर करून या उद्योग्यविश्वाला एकत्र आणणे  हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

आयसीपीएमएचे अध्यक्ष हितेश नागपाल यांनी यावेळी असोसिएशनची वैशिष्ट्ये सांगितली, देशातील कोरुगेटेड उद्योगाचे तांत्रिक चित्र बदलण्यात असोसिएशनमधील सदस्यांच्या योगदान महत्त्वपूर्ण आहे. तसेच असोसिएशनमधील सदस्यांच्या प्रगतीला चालना देण्याचे संस्थेचे ध्येय असून असोसिएशमधील प्रत्येक सहभागी व्यक्तीने पुढील पिढ्यांच्या फायद्यासाठी त्यांच्या व्यवसायात सुधारणा करण्यात योगदान द्यायला हवे.आयसीपीएमएच्या सातत्यपूर्ण आणि नावीन्यपूर्ण प्रयत्नांद्वारे देशातील कोरुगेटेड उद्योगाचे सामर्थ्य वाढविण्याचे उद्दिष्ट त्यांनी स्पष्ट केले.

भारतीय पॅकेजिंग उद्योगाचे आर्थिक वर्ष २०२० मधील मूल्य अंदाजे ७५ अब्ज यूएसडी इतके होते. जे १८ ते २० टक्के चक्रवाढ वार्षिक दर गाठण्याच्या मार्गावर असून आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत २०० अब्ज यूएसडीपर्यंत पोहोचेल. भारताच्या अर्थव्यवस्थेतील पाचव्या क्रमांकाचे क्षेत्र असलेल्या किरकोळ बाजारामार्फत ही वाढ होते, जे निर्यातीतील सातत्यपूर्ण विस्तार क्षमता दर्शवते.

कोरु पॅक प्रिंट इंडिया २०२४’ हे पॅकेजिंग क्षेत्रातील व्यक्तींमधील नेटवर्किंग, उद्योग नेटवर्कचा विस्तार आणि नवीन पॅकेजिंग ट्रेंडबद्दल माहिती मिळण्याचे केंद्र असणार आहे. तसेच यावेळी १५० हून अधिक मशिनरी थेट पाहता येणार असून उपस्थितांना तज्ज्ञांसोबत संवाद साधता येणार आहे. या क्षेत्रातील ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचे हे उत्तम व्यासपीठ असेल. प्रदर्शनात २०० हून अधिक कंपन्या सहभागी होण्याची आशा आहे. ज्या यावेळी त्यांच्या आधुनिक यंत्रसामग्री आणि उत्पादनांचे प्रदर्शन करतील. हा कार्यक्रम भारत आणि परदेशातील विविध क्षेत्रांमधील ८००० हून अधिक खरेदीदारांच्या स्वागतासाठी तयार आहे. या उद्योगाची आंतरराष्ट्रीय प्रगती आणि उद्योगांवरील प्रभाव यावर प्रदर्शनात भर देण्यात येणार आहे.

फ्युचरेक्स ग्रुपचे संचालक नमित गुप्ता म्हणाले की, हा नावीन्यपूर्ण आणि व्यावसायिक कौशल्याचा एक धोरणात्मक संगम आहे. उद्योगातील तज्ज्ञांना एकत्र आणून त्यांना अर्थपूर्ण सहकार्य देण्यासाठी सक्षम पाया उभा करण्याचे आमचे ध्येय आहे. तसेच या उद्योगाच्या तांत्रिक प्रगतीला चालना देण्यासाठी आणि कोरुगेटेड पॅकेजिंग मशिनरी उद्योगाला नवीन उंचीवर नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ग्राहक उत्पादनांची वाढती मागणी आणि ई-कॉमर्सच्या व्याप्तीमुळे भारतातील कोरुगेटेड पॅकेजिंग उद्योग भरीव वाढ अनुभवतो आहे. पॅकेजिंग क्षेत्राचा एक महत्त्वाचा घटक म्हणून, वितरणादरम्यान उत्पादन सुरक्षित राहण्यासाठी, ब्रँडची ओळख विकसित करण्यासाठी आणि माल वाहतूक खर्च व्यवस्थापित करण्यासाठी कोरुगेटेड पॅकेजिंग महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आहे.