भारतातील तीन बाजारपेठांनी गाठला 10 दशलक्ष चौ. फुटांचा टप्पा : बंगळुरु, एनसीआर आणि हैदराबाद

135

हैदराबाद ठरले सर्वाधिक लक्षणीय शहर, बंगळुरु सर्वोच्च स्थानावर कायम

 • 46% टक्क्यांसह आयटी आणि आयटीईएस क्षेत्राने भारतभरात अ श्रेणी कार्यालयीन जागांच्या वाढीला चालना दिली
 • बंगळुरु-एनसीआर-हैदराबाद या तीन शहरांनी सामावून घेण्याच्या क्षमतेचे नवे मापदंड रचले, या शहरांनी अनुक्रमे 15.6 दशलक्ष चौ. फूट, 10.9 दशलक्ष चौ. फूट आणि 9.5 दशलक्ष चौ. फूट जागा व्यापली, या शहरांमध्ये सामावून घेण्याची सरासरी क्षमता 10 दशलक्ष चौ. फूट अशी नोंदवण्यात आली
 • को-वर्किंग पद्धतीने आपली वाढ कायम राखत कार्यालये भाड्याने देण्याच्या व्यवहारात 14 टक्के वाटा नोंदवला

सॅविल्स या इंटरनॅशनल प्रॉपर्टी कन्सलटंट कंपनीने ऑफिस मार्केट वॉच 2019 हा सर्वसमावेशक अहवाल प्रसिद्ध केला आहे. मुंबई, नॅशनल कॅपिटल रीजन, बंगळुरु, चेन्नई, पुणे आणि हैदराबाद अशा देशातील आघाडीच्या कार्यालयीन बाजारपेठांसंदर्भात यात संशोधन करण्यात आले आहे. या अहवालात नमूद करण्यात आल्यानुसार, 2019 मध्ये कार्यालयीन जागांच्या मागणीने 2018 चा विक्रम तब्बल 22 टक्क्यांनी पुढे नेत समावेशाची क्षमता 57.72 दशलक्ष चौ. फुटांपर्यंत नेली. 2020 मध्येही व्यावसायिक कार्यालयीन जागांच्या मागणीत प्रचंड वाढ होणार आहे. व्यवसायवृद्धी, अधिग्रहण आणि अधिक कर्मचारीकेंद्री कार्यालयीन जागांची मागणी अशा काही घटकांमुळे ही वाढ होईल.

सॅविल्स इंडियाचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनुराग माथूर म्हणाले, “व्यावसायिक क्षेत्र, विशेषत: कार्यालयीन जागांची बाजारपेठ सातत्याने वाढतेच आहे. 2018 मधील 47.3 दशलक्ष चौ. फुटांचा टप्पा मागे टाकत या क्षेत्राने 2019 मध्ये 57.7 दशलक्ष चौ. फुटांचा नवा विक्रम रचला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या वाढत्या क्षमता, जागांच्या वापरातील लवचिकता, अर्थव्यवस्थेचे औपचारिकरण आणि पाश्चिमात्य कंपन्यांची वाढती संख्या यामुळे विविध बाजारपेठांमधील या वाढीचा पाया रचला गेला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत मंदी असूनही 2020 मध्येही अशीच प्रगती होत राहील, असा आमचा अंदाज आहे. यामुळे भारतातील रीअल इस्टेट क्षेत्र दीर्घकाळासाठी उत्तम स्थितीत राहील.”

भारतातील वर्षागणिक समावेशन क्षमता (दशलक्ष चौ. फूट)

2018 2019 बदल
बंगळुरु 13.5 15.6 15.4%
चेन्नई 5.0 8.0 60%
हैदराबाद 6.2 9.5 53.2%
मुंबई 6.2 6.9 11.3%
एनसीआर 9.6 10.89 13.7%
पुणे 6.8 6.8 0.0%
भारत 47.3 57.7 22%

*स्रोत: सॅविल्स इंडिया रीसर्च

 • हैदराबाद शहराने समावेशनाच्या संदर्भात सर्वाधिक वार्षक वाढ अनुभवली. 2019 मध्ये 9.5 दशलक्ष चौ. फुटांसह हैदराबादने समावेशनाच्या संदर्भात मागील वर्षीच्या 6.2 दशलक्ष चौ. फुटांच्या तुलनेत 53.2 वाढ अुनभवली.9.9 दशलक्ष चौ. फूट इतकी सर्वाधिक नवी जागा उपलब्ध करणारे शहरही हेच आहे.
 • आधीच्या अनेक वर्षांप्रमाणेच बंगळुरु हे 2019 मध्येही 15.6 दशलक्ष चौ. फुटांसह भारतातील सर्वात मोठ्या बाजारपेठेचे शहर ठरले. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ तब्बल 15.4 टक्के आहे. मागील वर्षी या शहरात समावेशनचे प्रमाण 13.5 दशलक्ष चौ. फूट होते. त्यामुळे यंदाची वाढ फारच लक्षणीय ठरते.
 • बंगळुरु, हैदराबाद आणि चेन्नई या तीन दाक्षिणात्य शहरांचा एकूण समावेशनातील वाटा 2019 मध्ये 57 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. 2018 मध्ये हे प्रमाण 52 टक्के होते.
 • या वर्षी एनसीआर हे एक लक्षणीय शहर ठरले आहे. वार्षिक 13.7 टक्क्यांची वाढ अनुभवत 10 दशलक्ष चौ. फुटांचा टप्पा गाठणारे बंगळुरुनंतर हे एकमेव शहर आहे.
 • चेन्नईमध्येही नव्याने झालेले भाडेकरार आणि आधीच्या व्यवहारांमध्ये चांगली वाढ झाली आहे. वार्षीक 60 टक्के वाढीसह येथील समावेशनाचे प्रमाण 8 दशलक्ष चौ. फुटांवर पोहोचले.
 • मुंबईत 2019 मध्ये समावेशनामध्ये 11.3 टक्के वाढ होऊन हे प्रमाण 6.9 दशलक्ष चौ. फुटांवर पोहोचले. मागील वर्षी पुण्याने सर्वाधिक टप्पा गाठला असला तरी 2019 मध्ये इथे फारसे बदल झालेले नाहीत.

भारतभरात सर्वसाधारण भाड्याच्या दरात वेगवेगळ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बंगळुरु आणि चेन्नईने विविध लहान बाजारपेठांमध्ये अनुक्रमे 15 आणि 20 टक्के वाढ अनुभवली. तर हैदराबादमधील भाड्याचे दर आताही सर्वाधिक आहेत. मुंबई-पुण्यात भाड्यात वार्षिक 4-5 टक्के वाढ नोंदवण्यात आली तर एनसीआरमध्ये 2019 मध्ये भाड्याच्या दरांमध्ये बदल झालेले नाहीत.

2019 मध्ये हैदराबादमध्ये समावेशनचा दर प्रचंड असल्याने जागा रिकाम्या राहण्याचे प्रमाणे 4.5 टक्क्यांवर घसरले. मुंबई आणि पुण्यातही जागा रिकाम्या असण्याचे प्रमाण 2019 मध्ये अनुक्रमे 13.9 आणि 4.3 टक्क्यांवर आले. तर बंगळुरुमध्ये जागा रिकाम्या असण्याचे प्रमाण 2019 मध्ये 7.54 टक्के होते. चेन्नईमध्येही 2019 पल्लवरम-थोराईपक्कम भागात मोठया प्रमाणावर जागा उपलब्ध झाल्याने जागा रिकाम्या राहण्याचे प्रमाण 12.3 टक्क्यांवर पोहोचले. एनसीआरमध्ये हे प्रमाण 2018च्या तुलनेत फक्त एका टक्क्याने वाढून 2019 मध्ये 18 टक्क्यांवर आले.

विविध शहरांमधील महत्त्वाचे निष्कर्ष

बंगळुरु

समावेशन ग्रेड ए स्टॉक रिकाम्या जागा
2018 13.5 दशलक्ष चौ. फूट 145.5 दशलक्ष चौ. फूट 5.9%
2019 15.6 दशलक्ष चौ. फूट 157.8 दशलक्ष चौ. फूट 7.0%
2020 (अंदाज) 16.2 दशलक्ष चौ. फूट 175.1 दशलक्ष चौ. फूट 5-7%
 • 2019 मध्येही बंगळुरुच सर्वाधिक फरकाने आघाडीवर होते. वार्षिक 15.4 टक्के वाढ अनुभव या शहरात 15.6 दशलक्ष चौ. फुटांच्या जागांचे भाड्याचे व्यवहार झाले
 • पुरवठा : बंगळुरुमध्ये सुमारे 12 दशलक्ष चौ. फुटांचे नवी बांधकाम झाले. यातील बहुतांश संकुले आणि कार्यालये ब्रूकफिल्ड आणि पेरीफेनल नॉर्थ बंगळुरु येथे आणि ओआरआर या पूर्व भागातील बिझनेस डिस्ट्रीक्टमध्ये आहेत.
 • तंत्रज्ञान, वित्त सेवा कंपन्या आणि सोयीनुसार वापरता येणाऱ्या कार्यालयांची मागणी सर्वाधिक होती. 2019 मध्ये या क्षेत्रांची मागणी भाडेपट्टीच्या एकूण गतिविधीपैकी जवळपास 70% टक्के होती.
 • पेरीफेरल नॉर्थ या बाजारपेठेतील सरासरी भाडे 2019 मध्ये वार्षिक 25 टक्के दराने वाढले. तर पेरीफेरल ईस्ट, सीबीडी आणि एसबीडी सिटीमध्ये भाड्याच्या दरात 15 ते 20 टक्के वाढ झाली
 • मागणीचा लेखाजोखा : भाड्याच्या व्यवहारांमध्ये पुढील वर्षभरात चार ते पाच टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.

दिल्ली एनसीआर

समावेशन ग्रेड -ए स्टॉक रिकाम्या जागा
2018 9.6 दशलक्ष चौ. फूट 103.3 5 दशलक्ष चौ. फूट 17.0%
2019 10.9 दशलक्ष चौ. फूट 117.3 5 दशलक्ष चौ. फूट 18.0 %
2020 (अंदाजे) 12.0 दशलक्ष चौ. फूट 124.6 5 दशलक्ष चौ. फूट 16-18 %

 

 • नॅशनल कॅपिटल रीजन (एनसीआर) मध्ये 2019 मध्ये वार्षिक 14 टक्के या दराने वाढ होऊन समावेशनाचे प्रमाण 10.9 दशलक्ष चौ. फुटांवर पोहोचले.
 • एनसीआर, गुरगावमध्ये वार्षिक 15 टक्के तर नोएडामध्ये वार्षिक 26 टक्के वाढ झाली
 • दिल्लीमध्ये जसोला येथे रिकाम्या जागांचे प्रमाण 15 टक्क्यांहून अधिक होते. तर, साकेतमध्ये ते 10 टक्के होते. दिल्लीतील इतर सर्व छोट्या बाजारपेठांमध्ये रिकाम्या जागांचे प्रमाण 5 टक्के होते.
 • गुरगावमध्ये सोहना रोड, एसपीआर आणि गोल्फ कोर्स एक्सटेंशन रोड येथे रिकाम्या जागांचे प्रमाण तुलनेन अधिक म्हणजेच सुमारे 30 टक्के होते. डीएलएफ सायबर सिटी, गोल्फ कोर्स रोड आणि उद्योग विहारमध्ये हे प्रमाण कमी होते. नोएडा एक्सप्रेसवे मध्ये हे प्रमाण 14 ते 15 टक्के होतें तर सेक्टर 62 मध्ये ते सर्वाधिक म्हणजेच सुमारे 25 टक्के होते.
 • एनसीआरसह तीनही महत्त्वाच्या शहरांमध्ये वार्षिक प्रमाण पाहता सर्व छोट्या बाजारपेठांमध्ये मूळ भाडे स्थिर होते. मात्र, दिल्लीमध्ये एरोसिटी बाजारपेठेत पाच ते सात टक्क्यांची वाढ दिसून आली. तसेच, गुरगावमध्ये डीएलएफ सायबर सिटीमध्ये भाड्याच्या रकमेत सुमारे सात टक्क्यांची वाढ दिसून आली.
 • मागणीचा लेखाजोखा : पुढील वर्षात एनसीआरमध्ये 8 ते 10 टक्के वार्षिक वाढ अपेक्षित आहे. 2020 मध्ये समावेशनाचे प्रमाण 12 दशलक्ष चौ. फुटांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे.

मुंबई

समावेशन ग्रेड ए स्टॉक रिकाम्या जागा
2018 6.2 दशलक्ष चौ. फूट 120.3 दशलक्ष चौ. फूट 16.1%
2019 6.9 दशलक्ष चौ. फूट 124.1 दशलक्ष चौ. फूट 13.9%
2020 (अंदाज) 7.2 दशलक्ष चौ. फूट 130.4 दशलक्ष चौ. फूट 12-14 %
 • मुंबई महानगर क्षेत्रात (MMR) 2019 मध्ये 11 टक्के साल दर साल वाढीसह 6.9 दशलक्ष चौ. फुट जागांवर समावेशन दिसून आले.
 • 2019 मध्ये भाड्याच्या व्यवहारांमध्ये वित्त सेवा, तंत्रज्ञान यासह इंजिनिअरिंग आणि उत्पादन क्षेत्राचा वाटा 60 टक्के आहे. तर एकूण समावेशनामध्ये कोवर्किंग पद्धतीचा वाटा नऊ टक्के आहे.
 • जागा रिकाम्या असण्याचे प्रमाण 2018 मधील 16 टक्क्यांवरून 2019 मध्ये 14 टक्क्यांवर घसरले. मात्र, नवी मुंबईतील बाजारपेठेत हे प्रमाण 20 टक्के आणि उत्तर मध्य मुंबईत हे प्रमाण 16 टक्के होते.
 • बहुतांश छोट्या बाजारपेठा उदा. ठाणे, नवी मुंबई आणि बीकेसीमध्ये भाड्याच्या दरांमध्ये सरासरी पाच टक्क्यांची वाढ झाली. पूर्व उपनगरातील एसबीडीमध्ये सुमारे 10 टक्के वार्षिक वाढ दिसून आली.
 • मागणीचा लेखाजोखा : मुंबईत समावेशनाच्या प्रमाणात 2020 मध्ये चार ते पाच टक्के वाढ होऊन हे प्रमाण 7.2 दशलक्ष चौ. फुटांवर जाण्याची शक्यता आहे.

सॅविल्स

सॅविल्स ही आघाडीची रीअल इस्टेट सेवा देणारी कंपनी आहे. ही कंपनी लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड आहे. जगभरात 600 हून अधिक कार्यालयांमधून आपल्या 39,000 हून अधिक कर्मचाऱ्यांसह ही कंपनी 70 देशांमध्ये कार्यरत आहे. विविध बाजारपेठांमध्ये जागा घेणे, भाड्याने घेणे किंवा मूल्यांकनाची गरज असलेल्या कॉर्पोरेट, संस्थात्मक आणि खासगी क्लाएंट्सना सॅविल्स सल्ला पुरवते. रीअल इस्टेटमधील संपूर्ण प्रक्रियेत ही कंपनी सहजसोपे पर्याय देऊ करते.

सॅविल्स इंडिया

सॅविल्स ही भारतातील व्यावसायिक सल्ला आणि व्यवहार, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट, मूल्यांकन आणि व्यावसायिक सेवा, संशोधन आणि कन्सलटिंग, औद्योगिक, लॉजिस्टिक आणि निवासी क्षेत्रातील सर्वसमावेशक सेवा देणारी कंपनी आहे. सखोल, क्षेत्रानुरुत ज्ञानासह व्यावसायिक शिस्तीमुळे क्लाएंटला अनोखा आणि नाविन्यपूर्ण रीअल इस्टेट पर्याय देऊ केला जातो. शिवाय, सेवेचा दर्जाही सर्वोत्कृष्ट राखला जातो.

सॅविल्स ही भारतातील आघाडीची व्यावसायिक आंतरराष्ट्रीय प्रॉपर्टी कन्सलटिंग फर्म आहे. सॅविल्सने 2016 च्या सुमाराम भारतात काम सुरू केले आणि तेव्हापासून त्यांनी लक्षणीय प्रगती केली आहे. बंगळुरु, मुंबई, दिल्ली एनसीआर, चेन्नई आणि पुणे येथे त्यांची कार्यालये आहेत. तसेच, क्लाएंट्सना उत्तम सेवा देण्यासाठी हैदराबाद, कोलकाता, चंदीगढ, गुवाहाटी, भुवनेश्वर, वडोदरा आणि इंदोर येथेही त्यांची उपस्थिती आहे.

परिशिष्ट

चेन्नई

समावेशन ग्रेड ए स्टॉक रिकाम्या जागा
2018 5 दशलक्ष चौ. फूट 67.7 दशलक्ष चौ. फूट 6.6%
2019 8 दशलक्ष चौ. फूट 71.2 दशलक्ष चौ. फूट 12.4%
2020 (अंदाज) 8.3 दशलक्ष चौ. फूट 81.1 दशलक्ष चौ. फूट 11-13%
 • 2019 मध्ये चेन्नईने समावेशनातील सर्वाधिक वाढ अनुभवली, 2018 च्या पाच दशलक्ष चौ. फुटांच्या तुलनेत हा आकडा आठ दशलक्ष चौ. फुटांवर पोहोचला
 • सतत वाढणाऱ्या या बाजारपेठेत 2018 च्या 6.6 टक्क्यांच्या तुलनेत 2019 मध्ये चेन्नईत रिकाम्या जागांचे प्रमाण 12.4 टक्क्यांपर्यंत वाढले,
 • चेन्नईतील महत्त्वाचे दाक्षिणात्य भाग, जसे की ओएमआर (प्री-टोल) आणि गुंडी-माऊंट पुनामल्लीपासून नैऋत्य भागात भाड्याच्या रकमेत अनुक्रमे 23 आणि 11 टक्के वाढ झाली
 • मागणीचा लेखाजोखा : 2020 मध्ये समावेशनाचा दर अंदाजे 8.3 दशलक्ष चौ. फूट असेल. त्यामुळे या शहरात भाड्याच्या व्यवहारांमध्ये तीन ते चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

पुणे

समावेशन ग्रेड ए स्टॉक रिकाम्या जागा
2018 6.8 दशलक्ष चौ. फूट 46 दशलक्ष चौ. फूट 4.7%
2019 6.8 दशलक्ष चौ. फूट 49.5 दशलक्ष चौ. फूट 4.2%
2020 (अंदाज) 7 दशलक्ष चौ. फूट 53.7 दशलक्ष चौ. फूट 3-5 %
 • 2019 मध्ये पुण्यातील कार्यालयीन जागांच्या समावेशनाचे प्रमाण 6.8 दशलक्ष चौ. फूट होते
 • 2019 मध्ये कार्यालयीन जागांमध्ये तंत्रज्ञान क्षेत्राचा वाटा 55 टक्के होता तर कोवर्किंग क्षेत्राने 20 टक्के वाटा व्यापला
 • भाड्याच्या व्यवहारांमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे रिकाम्या जागांचे प्रमाण 2018 मधील 4.7 टक्क्यांवरून 2019 मध्ये 4.2 टक्क्यांवर आले.
 • पुण्यातील बहुतांश छोट्या बाजारपेठांमध्ये भाड्याच्या दरात तीन ते पाच टक्के वाढ झाली. पेरीफेरल बिझेनस डिस्ट्रिक्ट (पीबीडी) ईस्ट आणि सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट (सीबीडी) मध्ये भाड्याच्या दरात अनुक्रमे 4.4 आणि 3.7 टक्के वाढ झाली
 • मागणीचा लेखाजोखा : 2020 मध्ये पुण्यातील कार्यालयीन जागांची बाजारपेठ 7 दशलक्ष चौ. फुटांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे.

हैदराबाद

समावेशन ग्रेड ए स्टॉक रिकाम्या जागा
2018 6.2 दशलक्ष चौ. फूट 47.2 दशलक्ष चौ. फूट 5.6%
2019 9.5 दशलक्ष चौ. फूट 57.1 दशलक्ष चौ. फूट 4.5%
2020 (अंदाज) 10.5 दशलक्ष चौ. फूट 69.9 दशलक्ष चौ. फूट 5-7%

 

 • हैदराबादमध्ये वार्षिक 53.2 टक्के वाढीसह समावेशनाचे प्रमाण 9.5 दशलक्ष चौ. फुटांवर पोहोचले
 • भाड्याच्या व्यवहारांमुळे 2018 मधील 5.6 टक्के रिकाम्या जागांचे प्रमाण 2019 मध्ये 4.5 वर पाहोचले
 • सेकंडरी बिझनेस डिस्ट्रिक्ट-I (एसबीडी-I)मधील छोट्या बाजारपेठा, विशेषत: मधापूर आणि एसबीडी-ll, गाचिबावली या भागांनी शहरातील भाड्याच्या व्यवहारांमध्ये 90 टक्के वाटा नोंदवला. 2019 मध्ये मधापूरमधील समावेशन साधारण दुप्पट झाले आहे.
 • भाड्याच्या दरात गाचीबावली मध्ये 14 टक्के तर मधापूरमध्ये 9 टक्के वाढ झाली
 • मागणीचा लेखाजोखा : 2020 मध्ये हैदराबादमधील कार्यालयीन बाजारपेठ 9 ते 10 टक्क्यांनी वाढेल. त्यामुळे, हे शहर 10 दशलक्ष चौ. फुटांचा टप्पा पार करेल, असा अंदाज आहे.

सॅविल्स

सॅविल्स ही आघाडीची रीअल इस्टेट सेवा देणारी कंपनी आहे. ही कंपनी लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड आहे. जगभरात 600 हून अधिक कार्यालयांमधून आपल्या 39,000 हून अधिक कर्मचाऱ्यांसह ही कंपनी 70 देशांमध्ये कार्यरत आहे. विविध बाजारपेठांमध्ये जागा घेणे, भाड्याने घेणे किंवा मूल्यांकनाची गरज असलेल्या कॉर्पोरेट, संस्थात्मक आणि खासगी क्लाएंट्सना सॅविल्स सल्ला पुरवते. रीअल इस्टेटमधील संपूर्ण प्रक्रियेत ही कंपनी सहजसोपे पर्याय देऊ करते.

सॅविल्स इंडिया

सॅविल्स ही भारतातील व्यावसायिक सल्ला आणि व्यवहार, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट, मूल्यांकन आणि व्यावसायिक सेवा, संशोधन आणि कन्सलटिंग, औद्योगिक, लॉजिस्टिक आणि निवासी क्षेत्रातील सर्वसमावेशक सेवा देणारी कंपनी आहे. सखोल, क्षेत्रानुरुप ज्ञानासह व्यावसायिक शिस्तीमुळे क्लाएंटला अनोखा आणि नाविन्यपूर्ण रीअल इस्टेट पर्याय देऊ केला जातो. शिवाय, सेवेचा दर्जाही सर्वोत्कृष्ट राखला जातो.

सॅविल्स ही भारतातील आघाडीची व्यावसायिक आंतरराष्ट्रीय प्रॉपर्टी कन्सलटिंग फर्म आहे. सॅविल्सने 2016 च्या सुमाराम भारतात काम सुरू केले आणि तेव्हापासून त्यांनी लक्षणीय प्रगती केली आहे. बंगळुरु, मुंबई, दिल्ली एनसीआर, चेन्नई आणि पुणे येथे त्यांची कार्यालये आहेत. तसेच, क्लाएंट्सना उत्तम सेवा देण्यासाठी हैदराबाद, कोलकाता, चंदीगढ, गुवाहाटी, भुवनेश्वर, वडोदरा आणि इंदोर येथेही त्यांची उपस्थिती आहे.