धनगर आरक्षणासाठी आत्महत्या करू नका ; आता अखेरपर्यंत लढायचं- मा.गोपीचंद पडळकर

199
  • वीर हुतात्मा परमेश्वर घोंगडे यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही

दिघंची (सांगली) :  सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात धनगर व मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सत्ताधाऱ्यांना जिकिरीचे झाले आहे.सत्तेत येण्यासाठी मराठा व धनगर आरक्षण या दोन मुद्यावर सत्ता हस्तगत केली .मात्र आजपर्यंत दोन्ही समाजाला आजपर्यंत सत्ताधारी आरक्षण देऊ शकले नाहीत.यांमुळे सध्या दोन्ही समाजाने आंदोलन सुरू केले आहे.
सध्या या आंदोलनामुळे सर्व समाज जागृत झाला असल्याने समाज बांधव पेटून उठले आहेत.मराठा समाज बांधव आजपर्यंत अनेक मुकमोर्चे काढून  प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला पण सत्ताधारी लक्ष न दिल्याने मराठा समाजाने आंदोलनाची दिशा बदलून आक्रमकता धारण केली आहे .याची झळ परिवहन मंडळाला सर्वाधिक बसली आहे .महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी बस जाळण्यात आल्या आहेत.
धनगर आरक्षण मात्र सध्या शांततेच्या मार्गाने सुरूच आहे. मात्र काही मराठा व धनगर बांधवांनी या आरक्षणासाठी अगदी टोकाची भूमिका घेऊन या आरक्षणासाठी च आपले बलिदान दिले आहे .यांमध्ये मराठा समाजातील काकासाहेब शिंदे व जगन्नाथ सोनवणे व रोहन तोडकर व धनगर समाजातील परमेश्वर घोंगडे  यांनी या आरक्षणासाठी आपले बलिदान दिले आहे.
या घटनेमुळे धनगर समाजाचे नेते मा.गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र राज्यातील सकल धनगर समाज बांधवांना भावनिक आवाहन केले आहे की या आरक्षणासाठी कुणीही आपला मौल्यवान जीव न देता या आरक्षणासाठी अखेरपर्यंत लढा देऊन प्रत्येक बांधवाना आरक्षण देण्यासाठी माझ्याबरोबर साथ देऊन हे आरक्षण मिळावे , म्हणून या लढ्यात प्रत्येक समाज बांधवाने  सहभागी होऊन या इतिहासाचे साक्षीदार व्हावे.
वीर हुतात्मा परमेश्वर घोंगडे यांच्या कुटुंबाच्या पाठिमागे सर्व धनगर समाज उभा राहणार : .मा गोपीचंद पडळकर
बालानगर, ता.पैठण जिल्हा-औरंगाबाद या ठिकाणी मा. गोपीचंद पडळकर व मा.उत्तमराव जानकर साहेब यांनी  धनगर आरक्षण लढ्यातील बलिदान पत्करलेला पहिला वीर हुतात्मा परमेश्वर घोंगडे यांच्या घरी जाऊन एकुलता एक मुलगा गमावलेल्या वडिलांची आणि अविवाहित लहान बहिणीची भेट घेतली, त्यांचे सांत्वन केले व संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज तुमच्या पाठीशी कायम खंबीर उभा राहील असे सांगितलं आणि त्यांच्या कुटुंबाला यावेळी आर्थिक मदत करण्यात आली.