आदित्य ठाकरे व अण्णा हजारे यांच्या सुरक्षेत वाढ

115

भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची वाय दर्जातील सुरक्षा हटवण्यात आली आहे आणि माजी राज्यपाल असलेल्या राम नाईक यांची झेड प्लस सुरक्षा कमी करून एक्स श्रेणीची करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस श्रेणीची सुरक्षा आणि अजित पवार यांची झेड सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त उज्ज्वल निकम, नारायण राणे, आशीष शेलार आणि प्रसाद लाड यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत देखील महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या स्टेट थ्रेट परसेप्शन समितीने याबाबतचे निर्णय घेतले आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या सुरक्षा कमिटीने 45 व्यक्तींच्या सुरक्षेत बदल केला आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर यांच्या नावाचा देखील समावेश आहे. कमिटीने 97 जणांच्या नावाबाबत विचार केला होता ज्यामध्ये नेता, खेळाडू आणि कलाकारांचा समावेश होता. या नावांवर विचार करून नंतर हा निर्णय घेण्यात आला. 2002 मध्ये सचिन तेंडुलकर यांना हल्ल्याची धमकी देण्यात आली होती त्यानंतर सरकारने त्यांना कडक सुरक्षा व्यवस्था देत झेड सुरक्षा पुरवली होती. नारायण राणे यांची वाय प्लस सुरक्षा घटवून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या समितीने 45 हाय-प्रोफाइल नागरिक आणि राजकारण्यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन हे बदल केले आहेत. मुख्य सचिव अजॉय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल, राज्याच्या गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांचा या समितीमध्ये समावेश आहे. ही समिती दर तीन महिन्यांनी एकदा भेटून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेते. स्थानिक पोलीस स्टेशन, गुप्तचर विभाग आणि स्वतंत्रपणे गोळा केलेल्या माहितीचे विश्‍लेषण करुन ही समिती कोणाला कितपत धोका आहे त्याचे विश्‍लेषण करते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर काल मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी सचिन तेंडुलकर यांच्या सोबत सुनील गावसकर यांनी देखील हजेरी लावली होती. यानंतर त्याची सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली होती असे देखील सांगण्यात येत आहे की याबाबतच्या निर्णयाची माहिती त्यांना स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली असावी. महाराष्ट्र सरकारकडून तेंडुलर आणि गावसकर या दोनीही खेळाडूंची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. या दोघांनाही एक्स श्रेणीची सुरक्षा शासनाकडून दिली जात होती. मिळालेल्या माहितीनुसार आता दोनीही खेळाडूंची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.