सिनेकलावंत बागल, पेंडसे यांना ‘युवा कला गौरव पुरस्कार’

324

पुणे | डी. आत्माराम

नांदेड सिटी येथे आयोजित ‘चौथ्या आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट ‘महोत्सवात अभिनेत्री मोनालिसा बागल व अभिनेता केतन पेंडसे यांना “कै. पतंगराव कदमसाहेब युवा कला गौरव” पुरस्कार महोत्सव आयोजक समितीच्या वतीने देण्यात आला.

सदरील पुरस्कार नांदेड सिटी येथील १९ज् रेस्टारंट येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे उपजिल्हाध्यक्ष महादेव मते यांच्या हस्ते देण्यात आला. अभिनेता केतन पेंडसे यांनी द् थ्रिलर नाईक, २६/११ आदी चित्रपटात प्रमुख भुमिकेत उल्लेखनीय काम केले आहे. तर अभिनेत्री मोनालिसा बागल यांनी प्रामुख्याने कमी वयामध्ये विविध चित्रपटात काम केले. त्यामध्ये त्यांचे गाजलेले चित्रपट झाला बोभाटा, शशी देवधर, परफ्युम, सोबत आदी चित्रपटात उत्कृष्ट काम केले आहे.

याप्रसंगी अभिनेत्री बागल यांनी ‘आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाच्या वतीने कलावंताना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात येणारे पुरस्कार या क्षेत्रात उत्तेजन देणारे आहेत.त्यामुळे त्यांना उर्जा मिळते याबद्दल महोत्सवाच्या संयोजकाचे आभार मानले. याप्रसंगी निर्माता नवनाथ जाचक, सेन्सार बोर्ड, मुंबई चे मेम्बर रोहित पाटील, खादीम स्टोअरचे संचालक केदार मोरे, सुवर्ण फार्माचे संचालक सचिन देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचलन महोत्सवाचे संयोजक अमोल भगत यांनी केले तर शेवटी १९ज् रेस्टारंटचे संचालक रोहित मते यांनी आभार मानले.