एमटीव्ही सादर करीत आहे, सुपरमॉडेल ऑफ द इअर

121

फ्लॅश बल्ब्स, फोटोशूट्स आणि चकचकीत रूप.. आपल्यासाठी सुपरमॉडेल म्हणजे अशीच असते. भल्यामोठ्या होर्डिंग्सवर झळकलेला चेहरा आणि एखाद्या प्रसिद्ध मॅगझीनच्या कव्हरपेजवर उजळलेला फोटो हे आयुष्य खरोखर हेवा वाटावा, असेच आहे. पण हे इतकेच असते का.. नाही.. या ग्लॅमरच्या मागे वर्षानुवर्षाची मेहनत असते, संघर्ष असतो आणि स्वतःला सुपर बनवण्यासाठीची एक शिस्त असते. एमटीव्ही या भारतातील प्रथम क्रमांकाच्या तरुणांसाठीच्या मनोरंजन ब्रॅण्डने बूटकॅम्प आणि सुपरमॉडेल बनण्यासाठीच्या युद्धाचा ताजा सीझन प्रेक्षकांसाठी आणला आहे. लिवॉन एमटीव्ही सुपरमॉडेल ऑफ द इअर हा खास पुरस्कार एमटीव्हीने सादर केला असून यासाठी इन्फिनिटी बाय हर्मन हे मनोरंजन भागीदार आहेत. फक्‍त एमटीव्हीवर २२ डिसेंबरपासून दर रविवारी सायंकाळी ७ वाजता ही स्पर्धा सादर करण्यात येणार असून या माध्यमातून भारताला आपली पुढची सुपरमॉडेल मिळू शकणार आहे.

लिवॉन एमटीव्ही सुपरमॉडेल ऑफ द इअर, एण्टरटेन्मेंट पार्टनर इन्फिनिटी बाय हर्मन हा इव्हेंट केवळ स्टाईलवर आधारित आहे. ग्लॅमर आणि चांगल्या रूपाभोवतीचे गैरसमज मोडून काढत आगळेवेगळे, अपारंपरिक आणि परफेक्शनपासून दूर असलेले सौंदर्य या स्पर्धेतून आम्ही शोधणार आहोत. मलायका अरोरा ही सर्वोत्कृष्ट फॅशनिस्टा परीक्षकांच्या तुकडीत सहभागी होणार असून तिच्यासोबत तरुणींचा हार्टथ्रोब मिलिंद सोमण देखील मंचावर परीक्षकाच्या भूमिकेत असणार आहे. याशिवाय, भारतीय टेलिव्हिजनवर प्रथमच परीक्षक बनणारी अग्रेसर फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताही या परीक्षकांमध्ये सहभागी होणार आहे. या स्पर्धेत सूत्रसंचालक म्हणून अनुषा दांडेकर ही फॅशन आयकॉन सहभागी होणार असून भारतातील पहिली महिला सुपरमॉडेल उज्ज्वला राऊत ही स्पर्धकांना मार्गदर्शन करणार आहे.