एअरटेलने अॅमेझॉन पे गिफ्ट कार्डच्या माध्यमातून स्मार्टफोन ग्राहकांचे मानले आभार

213
  • एअरटेल प्रीपेड आणि पोस्टपेड स्मार्टफोन ग्राहकांना अॅमेझॉन पे डिजिटल गिफ्ट कार्ड मिळणार,
  • मोबाइल रिचार्जबिल पेमेंट आणि Amazon.in वर खरेदी करण्यासाठी वापर

मुंबई ऑगस्ट 2018: 23 व्या वर्धापनदिनानिमित्त एअरटेलने अॅमेझॉन पेसह स्मार्टफोनच्या ग्राहकांसाठी आकर्षक भेट आणली आहे. स्मार्टफोन वापरणाऱ्या एअरटेल प्रीपेड आणिपोस्टपेड ग्राहकांना 51 रुपयांचे स्पेशल अॅमेझॉन पे डिजिटलगिफ्ट कार्ड देण्यात येणार आहे. या गिफ्ट कार्डातून अॅमेझॉन पे बॅलन्स भरता येऊ शकेल. शिवाय, मोबाइल रिचार्ज करणे,बिले भरणे किंवा अॅमेझॉनच्या भारतातील विस्तारीत श्रेणीतील खरेदी करण्यासाठी हे कार्ड वापरता येईल. याशिवाय अॅमेझॉनपेच्या भागीदार व्यापाऱ्यांकडेही हे कार्ड वापरता येणार आहे.

100 रुपयांचे किंवा अधिक किंमतीचे एकत्र पॅक वापरणारे प्रीपेडचे ग्राहक आणि पोस्टपेडचा कोणताही ‘इन्फिनिटी’ प्लॅन वापरणारे ग्राहक या विशेष अॅमेझॉन पे गिफ्ट कार्डासाठी पात्र ठरतील.

डिजिटल गिफ्ट कार्ड माय एअरटेल अॅपमध्ये मिळवता येईल. त्यासाठी ग्राहकांना फक्त प्ले स्टोअर (अँड्रॉइड) किंवा अॅप स्टोअर (आयओएस) मधून माय एअरटेल अॅप डाउनलोड करायचे आहे. तसेच माय एअरटेल अॅपमधील “एअरटेल थँक्स’’वरक्लिक करून यातील गिफ्ट कार्ड अॅक्टिव्हेट करता येईल.

हे डिजिटल गिफ्ट कार्ड ग्राहकांसाठी एअरटेल प्रीपेडच्या 100 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीच्या एकत्र पॅकवर पुढील 30 दिवसांसाठी उपलब्ध होईल किंवा कोणत्याही पोस्टपेड प्लॅनसाठी अपग्रेड होईल.

ग्राहक माय एअरटेल अॅपसारख्या चॅनेलमधून किंवा Amazon.inसारख्या पोर्टलमधून रिचार्ज करू शकतात किंवा जवळच्या रिटेलरकडून किंवा एअरटेल स्टोअरमधूनही रिचार्ज करूशकतात. ही ऑफऱ ठरावीक कालावधीसाठी उपलब्ध आहे.

एअरटेल ऑफरमधून एकत्र रिचार्जच्या श्रेणीतील अनेक लाभ मिळतात. यामुळे तुम्हाला हाय स्पीड डेटा आणि देशभरातील अमर्यादित विनामूल्य रोमिंग उपलब्ध होते. एअरटेल इन्फिनिटी पोस्टपेड योजनांद्वारे मोठ्या प्रमाणात डेटा उपलब्ध होतो,तसेच महिन्यातील उर्वरित डेटा पुढील महिन्यात लागू होतो, तसेच अमर्यादित विनामूल्य देशभरातील रोमिंग, एक वर्षाचे अॅमेझॉन प्राइम मेंबरशीप आणि एअरटेल टीव्ही आणि विंक म्युझिकचे सबस्क्रिप्शन मिळते. एअरटेल हे भारतातील विविधएजन्सींबरोबर सर्वात जलद गतीने विस्तारलेले मोबाइल नेटवर्क आहे.

या भागीदारीविषयी भारती एअरटेलच्या प्रमुख मार्केटिंग अधिकारी,वाणी वेंकटेश म्हणाल्या, “आमच्याबरोबर आमचे ग्राहक तब्बल 23 वर्षे संलग्नित राहिल्यामुळे आम्ही भारतातील अग्रेसर स्मार्टफोन हे स्थान प्राप्त करू शकलो. यासाठी आम्हीत्यांचे आभार मानतो. या आनंदाप्रित्यर्थ आमच्या ग्राहकांबरोबर खास अॅमेझॉन पे बरोबर संलग्नित होताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांमध्ये ऑनलाइन खरेदी अतिशय लोकप्रिय आहे. भारताच्या सर्वात जलदनेटवर्कमध्ये उत्तम डेटाच्या अनुभवासह आमच्या ग्राहकांना आता अॅमेझॉनवरून विस्तारीत श्रेणीतील ऑफर/डीलमध्ये खरेदी करता येणार आहे, तसेच रिचार्ज करता येईल आणि बिलही भरता येणार आहे, या नव्या कार्डासह त्यांना नवीनमूल्याधिष्ठित सेवा प्राप्त होणार आहेत.’’

अॅमेझॉन पे इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक शरीक प्लास्टिकवाला म्हणाले की, “एअरटेलच्या आनंदात आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, याचा आम्हाला अतिशय आनंद झाला आहे. आमच्या ग्राहकांच्या गरजा आम्ही चांगल्या समजून घेतो, आमचेग्राहक नियमितपणे वापरत असलेल्या व्यासपीठांवरून त्यांना पेमेंटचा अनुभव विस्तारीत करण्याची संधी आम्ही शोधत होतो. या गिफ्ट कार्डाच्या सहाय्याने एअरटेलचे ग्राहक आता Amazon.inवर प्रीपेडसाठी मोबाइल रिचार्ज करू शकतात आणिबिलेही भरू शकतात.