&TV प्रस्‍तुत करीत आहे बाबासाहेबांची जीवनगाथा सादर करणारी मालिका एक महानायक – डॉ. बी. आर. आंबेडकर

515

”संविधान कितीही चांगले असो, त्‍याची अंमलबजावणी करणारे लोक चांगले नसतील, तर ते संविधान वाईट ठरेल. याउलट संविधान वाईट असो, त्‍याची अंमलबजावणी करणारे लोक चांगले असतील, तर ते संविधान चांगले ठरेल” – डॉ. बी. आर. आंबेडकर.

भारताच्‍या संपन्‍न इतिहासामध्‍ये काही प्रख्‍यात नेत्‍यांनी भारताचे नेतृत्‍व केले आहे. त्‍यांनी भावी पिढीसमोर एक आदर्श उभा केला आहे आणि ते सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. भारतीय इतिहासामधील असेच एक नेते आहेत ‘एक महानायक – डॉ. बी. आर. आंबेडकर’, ज्‍यांनी क्रांती घडवून आणली आणि त्‍यांचा आवाज घरोघरी पोहोचला. भारतीय संविधानाचे शिल्‍पकार. लाखो भारतीयांच्‍या मनात स्‍थान मिळवलेले एक थोर व्‍यक्तिमत्त्‍व. एक सर्वोत्तम नेता, त्‍यांचा वारसा अद्वितीय आहे.

&TV हिंदी जीईसी क्षेत्रामध्‍ये त्‍यांची प्रबळ सामाजिक-ड्रामा मालिका ‘एक महानायक –डॉ. बी. आर. आंबेडकर’सह या असाधारण व्‍यक्तिमत्त्‍वाची यापूर्वी कधीच न सांगण्‍यात आलेली जीवनगाथा, त्‍यांची आंदोलन वृत्ती आणि ते संघटित भारताचे कशाप्रकारे अग्रदूत बनले ते सादर करत आहे. स्‍मृती शिंदे यांच्‍या सोबो फिल्‍म्‍सची निर्मिती असलेली ही मालिका बाबासाहेबांच्‍या वयाच्‍या पाचव्‍या वर्षांपासून ते भारतीय संविधानाचे शिल्‍पकार बनण्‍यापर्यंतचा त्‍यांचा प्रवास सांगणारी प्रेरक कथा आहे. मालिका ‘एक महानायक – डॉ. बी. आर. आंबेडकर’मध्‍ये अभिनेता प्रसाद जवादे, डॉ. बी. आर. आंबेडकर यांची प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच बालपणीच्‍या आंबेडकरांची भूमिका आयुध भानुशाली साकारणार आहे. जग्‍गू निवंगुणे आंबेडकरांच्‍या वडिलांची, नेहा जोशी आईची, साउद मन्‍सुरी मोठ्या भावाची, अथर खान लहान भावाची आणि तुलसा व वंशिका यादव त्‍यांच्‍या बहिणींची भूमिका साकारताना दिसणार आहेत. मालिका १७ डिसेंबर २०१९ पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता &TV वर प्रसारित होईल.

या नवीन मालिकेबाबत बोलताना &TV चे व्‍यवसाय प्रमुख विष्‍णू शंकर म्‍हणाले, ”डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी एक देश-एक संविधान या विचारसरणीअंतर्गत लाखो भारतीयांना एकत्र आणत संघटित भारताचा पाया रचला. त्‍यांची शिकवण व तत्त्‍वं आजही देशभरातील भारतीयांमध्‍ये रुजलेली आहेत. भारतीय मातीसाठी लोकशाही घडवून आणणा-या त्‍यांच्‍या आव्‍हान करण्‍याच्‍या आणि क्रांती घडवून आणण्‍याच्‍या क्षमतेमुळे ते आपल्‍या काळातील थोर नेते बनले. आम्‍हाला हिंदी जीईसी क्षेत्रामध्‍ये पहिल्‍यांदाच डॉ. बी. आर. आंबेडकर यांचा जीवनप्रवास दर्शवणारी मालिका सादर करण्‍याचा अभिमान वाटत आहे. मला खात्री आहे की, त्‍यांची कथा कानाकोप-यातील भारतीयांच्‍या मनाला स्‍पर्श करेल आणि प्रोत्‍साहित करेल.”

सोबो फिल्‍म्‍सच्‍या संचालक स्‍मृती सुशीलकुमार शिंदे म्‍हणाल्‍या,”बाबासाहेब म्‍हणून लोकप्रिय असलेले भारतीय संविधानाचे शिल्‍पकार डॉ. बी. आर. आंबेडकर हे महान समाजसुधारक, शिक्षणतज्ञ आणि राजकीय नेते होते. डॉ. बी. आर. आंबेडकर यांचे जीवन त्‍यांच्‍या जन्‍मापासून शेवटच्‍या श्‍वासापर्यंतच्‍या संघर्षाची प्रेरणादायी गाथा आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की, आमची मालिका ‘एक महानायक – डॉ. बी. आर. आंबेडकर’ ही एक अनोखी जीवनगाथा ठरेल. या मालिकेमधून एक पुरूष त्‍याचा स्‍पष्‍ट व सर्वसमावेशक दृष्टिकोन, अदम्‍य चिकाटी व निर्धारासह कशाप्रकारे यश प्राप्‍त करू शकतो हे दाखवण्‍यात येणार आहे.

या मालिकेसह पदार्पण करणारी अभिनेत्री नेहा जोशी म्‍हणाली, ”माझे हे हिंदी टेलिव्हिजनवरील पदार्पण असून मी पहिल्‍यांदाच आईची भूमिका साकारत आहे. समाजातून भेदभाव, अधोगती व वंचितपणा दूर करण्‍यासाठी संपूर्ण जीवन झटलेल्‍या, तसेच भारतीय संविधानाचे शिल्‍पकार ठरलेल्‍या एका महान व्‍यक्तिमत्त्‍वाच्‍या आईची भूमिका साकारण्‍याची संधी मिळाल्‍याने खूपच सन्‍माननीय वाटत आहे. भीमाबाई (आंबेडकर यांच्‍या आई) विनम्र महिला होत्‍या. त्‍यांनी प्रामाणिकपणे त्‍यांच्‍या पतीला पाठिंबा दिला आणि त्‍यांच्‍या मुलाला चांगले जीवन घडवण्‍यासाठी प्रोत्‍साहित केले. त्‍यांची त्‍यांना चांगले जीवन देण्‍याची इच्‍छा होती आणि त्‍यांच्‍या स्‍वास्‍थ्‍यासाठी अथक मेहनत घेतली.”

हिंदी टेलिव्हिजनवरील पदार्पण आणि भूमिकेबाबत बोलताना अभिनेता जगन्‍नाथ निवंगुणे म्‍हणाला, ”आंबेडकरांचे वडिल रामजी यांची भूमिका साकारण्‍यासाठी माझी निवड करण्‍यात आल्‍यामुळे माझ्यासाठी हा अत्‍यंत अभिमानास्‍पद क्षण आहे. भीमराव यांची शिक्षणाप्रती उत्‍कंठता आणि त्‍यांची मूल्‍ये त्‍यांच्‍या वडिलांनीच त्‍यांच्‍यामध्‍ये बिंबवली. रामजी शिस्‍तबद्ध असले तरी ते नेहमीच त्‍यांचा मुलगा व पत्‍नीच्‍या कल्‍याणासाठी झटले. मालिकेसाठी शूटिंग पूर्ण उत्‍साहात सुरू आहे. मी ही मालिका प्रसारित होण्‍याची उत्‍सुकतेने वाट पाहत आहे.”