Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर, मुळशीमध्ये तीन ठिकाणी गोळीबार

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याच्या हत्या प्रकरणात नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे. शरद मोहोळ याची 5 जानेवारी 2024 ला कोथरूडमधील सुतारदरा येथील राहत्या घराजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकरने आपल्या साथीदारांच्या मदतीने त्याच्यावर गोळ्या घातल्या होत्या. दुपारी दीड वाजता हा गोळीबार झालेला, शरद मोहोळचा जागेवरच मृत्यु झाला होता. आरोपींना पोलिसांनी त्याच दिवशी रात्री उशिरा ताब्यात घेतलं होतं. एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली होती. अशातच या प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे.

Sharad Mohol : संदीप मोहोळच्या हत्येनंतर शरद मोहोळने वैकुंठातच घेतली होती ‘अशी’ शपथ; तपासात अनेक गोष्टी उघड

शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, अमित कानगुडे, चंद्रकांत शेळके, नामदेव कानगुडे, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले या आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. पोलिसांना सर्वांना समोरा-समोर बसवत चौकशी केल्याची माहिती समजत आहे. या प्रकरणात आणकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. धनंजय वटकर (रा. कराड) आणि सतीश शेडगे (रा. मुळशी) यांनी पिस्तुल पुरवल्याची माहिती आहे.

Sharad-Mohol-Munna-Kolekar-Namde

शरद मोहोळ याला कट रचून संपवल्याचं आता समोर आलं आहे. पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे की, आरोपी साहिल याने मुळशीमध्ये तीन ठिकाणी पिस्तुल चालवण्याचा सराव केला होता. त्यासोबतच याआधीसुद्धा शरद मोहोळ याला एकट्याता मारण्याचा प्रयत्न झाल्याचं समजत आहे. मात्र त्यावेळी आरोपींचा हा प्रयत्न फसलेला. मुन्ना पोळेकर याने शरद मोहोळचा विश्वास जिंकला होता, कारण मोहोळला थोडीफारही कल्पना आली नाही. मुन्ना पोळेकर हा त्याची सावली नाही तर काळ बनून फिरत आहे.

Sharad Mohol : संदीप मोहोळच्या हत्येनंतर शरद मोहोळने वैकुंठातच घेतली होती ‘अशी’ शपथ; तपासात अनेक गोष्टी उघड

या प्रकरणात आणखी आरोपी समोर येण्याची शक्यता आहे. नामदेव कानगुडे साहिलचा म्हणजेच मुन्नाच्या मामाला सुत्रधार म्हटलं जात असलं तरी खरा मास्टरमाईंड आणखी दुसराच कोणीतरी असल्याची शक्यता वाटत आहे. आरोपींच्या पोलीस कोठडीत 7 दिवसांची वाढ केली असून आणखी कोणते नवीन खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.