Revenge Porn Case Shocks Nagpur : पॉर्नद्वारे घेतला बदला, प्रेयसीचे अश्लिल व्हिडिओ, छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल

Nagpur Crime News : नागपूर पोलिसांनी एका 43 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यावर माजी प्रेयसी असलेल्या महिलेचे खासगी व्हिडिओ, फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे त्याने बदला घेण्याच्या उद्देशाने ही सर्व सामग्री व्हायरल व्हावी यासाठी अनेकांना वितरीत केली. ज्याचा पॉर्न रिव्हेंज (Revenge Porn) म्हणून उल्लेख केला जात आहे. या व्यक्तीला पोलिसानी 6 जानेवारी रोजी अटक केली. आरोपीने पीडितेची अश्लील सामग्री तिचा पती आणि आपल्या सहाऱ्यांसह जवळपास 11 जणांना पाठवली. प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला ताब्यात घेण्यासाठी कारवाई सुरु केली होती. मात्र, एफआयआर दाखल झाल्यापासून आरोपी पाठिमागील तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता आणि अटक टाळत होता.

मशीनमध्ये डोके अडकून कामगार ठार

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीने माजी प्रेयसी असलेल्या मैत्रिणीवर पाळत ठेवली. तिचा मोबाईल हॅक करुन तिचे संभाषण मिळवले. आरोपी पीडितेच्या सातत्याने मागावर होता. त्यामुळे त्याला अल्पावधीतच लक्षात आले की, तिची तिच्या पतीशीवाय आणखी कोणत्यातरी पुरुषाशी जवळीक आहे. त्यामुळे त्याने या संबंधातील आणखी माहिती मिळवली. त्यांचे संभाषण आणि छायात्रिचेही मिळवली. जी त्याने वेगवेगळ्या पेनड्राईव्हमध्ये साठवली. पीडितेची प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि जुन्या संबंधांचा बदला घेण्यासाठी आरोपीने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे.

Shiv Sena MLA Disqualification Decision : अखेर निकाल आला; एकनाथ शिंदे यांचा पक्षच…

नागपूर पोलिसांच्या तपासात पुढे आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने पिडितेचे खासगी फोटो, खासगी चॅट्स कॉपी केले आणि ते वेगवेगळ्या पेनड्राईव्हमध्ये साठवले. हे सर्व वेगवेगळे पेनड्राईव्ह त्याने पीडितेचा पती आणि आपल्या तसेच महिलेच्या सहकाऱ्यांसह इतर 11 जणांना पोस्ट केल्याची माहिती आतापर्यंत पुढे आली आहे. या सर्व सामग्रीची साठवण असलेला आणखी एक स्वतंत्र पेनड्राईव्ह आरोपीने स्वत:सोबत बाळगला होता. आरोपीने ही सामग्री फक्त 11 लोकांनाच पाठवली आहे की, इतर माध्यमांतून ही सामग्री आणखीही कोटे पोहोचली आहे, याबातब पोलीस तपास करत आहेत.

Pune Crime Case : पुण्यात बापाचं निर्घृण कृत्य! घरी कोणी नसताना सावत्र मुलीवर केला बलात्कार, आरोपीला अटक

पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. त्यानंतर त्याच्या घरामध्ये शोध घेतला असता पोलिसांनी काही पेनडाईव्ह, लॅपटॉप यांसारखी काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरुच आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्यापासून इंटरनेट विश्वात क्रांती घडली आहे. परिणामी त्याचे फायदे तितकेच तोटेही पुढे येऊ लागले आहेत. पाठिमागील काही काळापासून वेगवेगळ्या प्रकारे होणाऱ्या सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ झाल्याचे अनेक अहवालांतून पुढे येत आहे.

iPhone सारखा फोन मिळवा स्वस्तात, फीचर्सवर पहाल तर व्हाल एकदम फिदा