स्पर्धा परीक्षा जीवनाला कलाटणी देणारी

134

पुणे – “स्पर्धा परीक्षा’ म्हणजे जीवनाला कलाटणी देणारी असते. जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी असल्यास यश हे निश्‍चित मिळते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. मामासाहेब मोहोळ महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी आयोजीत “स्पर्धा परीक्षेची ओळख’ या विषयावर मार्गादर्शन करताना प्रादेशिक परिवहन विभागातील स्नेहा पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक सतिश नवले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुषमा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक प्रा. सोपान गंभीरे यांनी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत घेण्यात येणाऱ्या व्याख्यानांचे स्वरूप स्पष्ट केले. उपप्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे यांनी याप्रसंगी स्पर्धा परिक्षेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच नियोजन व सूत्रसंचालन डॉ. रूपाली शेंडकर आणि प्रा. स्वाती शिंदे यांनी केले. डॉ. आदिनाथ पाठक यांनी आभार मानले.