सिंहगडावर उद्या पर्यटकांची गैरसोय होण्याची शक्यता

184

सिंहगड घाट रस्ता एक जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आला असताना, उद्या, रविवारी (दि. ८) पायथ्यापासून दुसऱ्या राष्ट्रीय एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवार होणार आहे. त्यामुळे सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

सिंहगडावर दर रविवारी पहाटे जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. घाट रस्त्यावरील धोकादायक ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एक जानेवारीपर्यंत घाट रस्ता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पायवाटेने पर्यटकांना गडावर जाता येते. येत्या रविवारी मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशन, ग्रामीण पोलिस, सिंहगड घेरा समिती, वनीकरण विभाग, पुरातत्व विभाग आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांच्या वतीने ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमुळे शनिवारी सायंकाळपासूनच परिसरात वाहनांची गर्दी होणार असल्यामुळे रविवारी पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.