सहा वर्षांनी उघड झालेल्या दुहेरी खूनाच्या गुन्ह्यात एकाला जामीन

190

घटनेनंतर सहा वर्षांनी उघड झालेल्या मुलगा आणि आईच्या दुहेरी खून प्रकरणात 20 महिन्यापासून तुरूंगात असलेल्याला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रकाश नाईक यांनी 25 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला आहे.

रामचंद्र ऊर्फ सनी राजू जाधव असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. शुभांगी परुळेकर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. मुख्य आरोपी सुनील कांबळे तडीपार होता. पोलिसांना तो हिंजवडी भागात आढळून.

पोलिसांनी 2 फेब्रुवारी 2017 रोजी त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने पत्नीशी गैरवर्तन केल्याने पिंटू ऊर्फ संभाजी घोटे याला 2011 मध्ये कारमधून भिमाशंकर येथे नेवून त्याचा खून केला. त्याला घाटात फेकून दिले. त्याच्या आईने तो कुठे आहे, विचारणा केल्याने त्यांचाही खून करून लोणावळा येथील घाटात मृतदेह टाकल्याचे सांगितले. पोलिसांना पिंटुचा मृतदेह मिळून आला. मात्र, त्यांच्या आईचा मिळाला नव्हता. कारमध्ये सुनील कांबळे याच्यासोबत असल्याने रामचंद्र याला घोडेगाव पोलिसांनी 8 फेब्रुवारी 2018 मध्ये अटक केली. तेव्हापासून तो तुरूंगात होता.

सुनील याने पिंटू, त्याच्या आईचा खून केल्यानंतर पिंटुच्या पत्नीशी विवाह केला. मात्र, काही दिवसात त्यांच्यात वाद होऊ लागले. त्यामुळे तिने सुनील याला सोडून दुसरा विवाह केला. तिचा आणि रामचंद्र याने जिच्यापशी कबुली दिली. त्या त्याच्या मैत्रिणीचा जबाब नोंदविण्यात आला होता. मात्र, हा पुरेसा पुरावा नाही. या प्रकरणात यापूर्वी एकाला जामीन मिळाला आहे. रामचंद्र यालाही जामीन देण्याचा युक्तीवाद ऍड. शुभांगी परूळेकर यांनी केला.