हिंदु जनजागृती समितीचा ‘विशेष संवाद’ !

148
Top
डॉ. झाकीर नाईकला आश्रय देणार्‍या कतारला भारताने प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे ! – अधिवक्ता सतीश देशपांडे

 

     ‘फिफा फुटबॉल विश्वचषका’चे आयोजन करणार्‍या कट्टर इस्लामी देश कतारमध्ये सर्व इस्लामी परंपरा पाळले जातातकतारने यंदाच्या विश्वचषकाला धार्मिक रंग दिला आहेविश्वचषक सुरु होण्यापूर्वी कतारमध्ये 500 हून अधिक नागरिकांचे इस्लाममध्ये धर्मांतर केल्याच्या बातम्या समोर येत आहेतभारताने आतंकवादी म्हणून घोषित केलेला डॉझाकीर नाईक याला सध्या कोणताही देश आश्रय देत नसतांना कतारने आश्रय दिला आहेयाच कतारने हिंदु देवदेवतांची विडंबना करणारा वादग्रस्त चित्रकार मकबूल फिदा हुसेन यालाही आश्रय दिला होतातसेच कतारने नुपूर शर्मा प्रकरणात भारताला खडसावले होतेभारताने उपस्थित केलेल्या प्रश्नावर ‘डॉझाकीर नाईकला आम्ही बोलावले नाही’असे ‘राजकीय उत्तर’ कतारने दिले आहेडॉझाकीर नाईकला आश्रय देणार्‍या कतारचा भारतविरोधी इतिहास पाहता कतारला कसे प्रत्युत्तर द्यावेहे भारताने ठरवण्याची वेळ आता आली आहेअसे स्पष्ट प्रतिपादन इतिहास व संस्कृती अभ्यासक आणि लेखक अधिवक्ता सतीश देशपांडे यांनी केलेहिंदु जनजागृती समिती आयोजित ‘फिफा फुटबॉल विश्वचषकामध्ये जिहादी डॉझाकीर नाईक का आमंत्रित?’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होेते.

    सुदर्शन न्यूजचे ‘चॅनेल हेड’ श्रीमुकेश कुमार म्हणाले कीडॉझाकीर नाईकला कट्टर इस्लामी देश कतारने फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या आयोजन कार्यक्रमात बोलावले. ‘फुटबॉल हा खेळ इस्लामनुसार ‘हराम’ आहे !’ हे वर्षांपूर्वी डॉझाकीर नाईक याने म्हटले होतेतसेच त्याने त्या वेळी फुटबॉल खेळणेपाहणे यालाही मनाई केली होतीझाकीर नाईकने त्या वेळी मलेशियात आसरा घेतला असल्याने 2017 पासून भारत सरकार त्याला आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेझाकीर नाईक विरोधात 2019 ला चार्टशीट दाखल झाली असून त्याच्या विरोधात ‘रेड कॉर्नर नोटिस’ दाखल व्हावीयासाठी भारत प्रयत्न करत आहेआता झाकीर नाईकने मलेशियातून कतार येथे स्थानांतर केल्यावर कतारने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केलातरी तो फार काळ वाचवू शकणार नाही.

    हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्रीसतीश कोचरेकर म्हणाले कीझाकीर नाईकने अत्यंत हीन स्तरावर हिंदु देवदेवतांवर टीका करत अपमान केला आहेहिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदु संघटनांच्या विरोधामुळे झाकीर नाईकला भारताबाहेर पलायन करावे लागले. ‘इसिस’सारख्या आतंकवादी संघटनांतील अनेक अतिरेक्यांनी झाकीरच्या भाषणांमुळे प्रेरणा मिळालीहे उघडपणे कबूल केले आहेया आंतरराष्ट्रीय आतंकवाद्याला फिफा फुटबॉल विश्वचषकात बोलावणार्‍या कतारचा आम्ही भारतीय नागरिकांच्या वतीने धिक्कार करतो.