सौरभ अमराळे पुणे शहर युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी

85

पुणे शहर काँग्रेस यांची संघटनात्मक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये पुणे शहर युवक काँग्रेस उपाध्यक्षपदासाठी सौरभ अमराळे यांना ७५३८ अशी भरगोस मते मिळाली असून ते विजयी झाले आहेत. त्यामुळे सौरभ अमराळे यांची पुणे शहर युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

कोरोनाच्या महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात लसीकरण, आरोग्य सुविधांवर भर, महिला सक्षमीकरण, जेष्ठ नागरिकांना सुविधा, गरजू नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचवून लाभ मिळवून दिला. त्यामुळे सामान्य जनतेच्या आशीर्वादामुळे व मित्र परिवाराच्या सहकार्यामुळे ही निवडणूक जिंकू शकलो असे सौरभ अमराळे म्हणाले, पुढे ते म्हणाले की गेल्या १५ वर्षांपासून मी काँग्रेसमध्ये सक्रिय आहे. त्याच बरोबर माझे कुटुंब गेल्या ४० वर्षांपासून कॉंग्रेसशी एकनिष्ठ आहे.

पुणे शहर युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे जबाबदारी वाढली असून आगामी काळात मोठ्या प्रमाणात मी प्रभागातील व पुणे शहरातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहीन.अशी माहिती सौरभ अमराळे यांनी दिली.