सोनाक्षी सिन्हाने शेअर केले मालदीवमध्ये घालवलेले सोनेरी क्षण

177

सोनाक्षी सिन्हाने मालदीवच्या आठवणींना ताजेतवाने करणारा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मधल्या समुद्रात आरामात माशासारखे पोहताना दिसत आहे.

सोनाक्षीचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून चाहते त्यावर बरीच प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण सोनाक्षीला जलपरी असल्याचे सांगत आहेत तर काहीजण एक चांगला जलतरणपटू असल्याचे म्हणत आहेत.

सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ने फोटो शेअर करत, सोना जल कि रानी है… जीवन उसका पानी है. असं कॅप्शन दिलं आहे.

सोनाक्षी सिन्हाने मालदीवमध्ये सुट्टी घालवत असताना स्कुबा डायव्हिंगही शिकली आहे. तिने फोटोही शेअर केला आहे.

सोनाक्षीने म्हटलं की, ‘मी आता सर्टीफाइड स्कूबा डायव्हर बनली आहे आहे. मला बर्‍याच वर्षांपासून हे करायचे होते, शेवटी आता ते पूर्ण झाले आहे. माझे समुद्राबद्दलचे प्रेम दिवसेंदिवस वाढत आहे. माझ्या सुपर कडक आणि सुपर मस्त ट्रेनर मोहम्मदचे आभार. कारण त्यानेच मला ही अद्भुत गोष्ट शिकविली. मी प्रथमच कोणत्याही परीक्षेत 100% गुण मिळवले आहेत.’