राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर सरचिटणीसपदी प्रमोदसिंह गोतारणे यांची नियुक्ती

31
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर सरचिटणीसपदी प्रमोदसिंह गोतारणे यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांनी गोतारणे यांना नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले. यापूर्वी गोतारणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाउपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन पुणे शहरातील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने पक्षाने त्यांना शहराच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, पक्षाची विचारधारा व तत्त्वांना केंद्रस्थानी ठेवून गोतारणे यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करावे, असे नियुक्ती पत्रात जगताप यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून समाजहित डोळ्यासमोर ठेऊन पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबरोबरच आगामी काळात शहरातील महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जास्तीत जास्त यश मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास गोतारणे यांनी व्यक्त केला.