महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या ‘कॅटापल्ट’ या भारतातील सर्वात मोठ्या लॉजिस्टिक इनक्यूबेटर कार्यक्रमात यशस्वी गटांसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी

72

बंगळुरू, २२ सप्टेंबर २०२२: भारतातील सर्वात मोठ्या थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स (३ पीएल) सुविधा पुरवठादारांपैकी एक असलेल्या महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेड (एमएलएल)ने आज बेंगळुरू येथे कॅटापल्ट प्रीमियर डे दरम्यान दहा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान स्टार्ट-अप्ससह धोरणात्मक सहकार्याची घोषणा केली.

  • कंपनीसोबत १० स्टार्ट-अप नाविन्यपूर्ण सुविधांवर काम करतील
  • दिवसभराचा मुख्य कार्यक्रम लॉजिस्टिक्स स्टार्ट-अप आणि आघाडीच्या कंपन्यांच्या पुरवठा  साखळी प्रमुखांना आकर्षित करणार

कॅटापल्ट इनक्यूबेटर कार्यक्रम हा महिंद्र लॉजिस्टिकचा सर्वात महत्त्वाकांक्षी तंत्रज्ञान आधारित उपक्रमांपैकी एक आहे. कॅटापल्ट २.० चे सहा गट गेल्या नऊ महिन्यांपासून एमएलएल सोबत  सहयोग करत आहेत आणि तंत्रज्ञान एमव्हीपीज या कालावधीत यशस्वीरित्या चालवण्यात आल्या.  एमव्हीपीजनी लॉजिस्टिक्स आणि गतिशीलता क्षेत्रात शाश्वत उपाय विकसित करणे आणि कामकाज कार्यक्षमता वाढवणे यावर लक्ष केंद्रित केले होते.

कॅटापल्ट कोहॉर्ट २.० मध्ये व्हिजन टेक, प्रगत विश्लेषण, एआय आधारित ऑप्टिमायझर, स्थान-आधारित मॉनिटरिंग टेक आणि शाश्वत लास्ट माईल वितरण उपाय यासारख्या विस्तृत तंत्रज्ञान डोमेनचा समावेश आहे. कोहॉर्ट २.० चा भाग असलेले सहा स्टार्टअप अॅसिओ रोबोटीक्स, लिंक्डडॉटस, कॉनस्टेम्स- एआय, सेन्सगिझ, जिडोका टेक्नॉलॉजीज आणि ऑरिता बाईक्स हे होते.

प्रीमियर डे एक्स्पोमध्ये, दहा स्टार्टअप्स (समूह 1 आणि 2) ने त्यांच्या तंत्रज्ञानातील नवकल्पनांचे प्रदर्शन केले जे प्रमाणित केले गेले. पुरस्कार सोहळ्यादरम्यान हायपर, एनमोव्हील, कॉयरीडर, अॅसिओ रोबोटीक्स, ऑरिता बाईक्स, कॉनस्टेम्स- एआय, लिंक्डडॉटस आणि सेन्सगिझ या आठ स्टार्ट-अपसोबत सामंजस्य करारा (MoUs) वर स्वाक्षरी करण्यात आली. तंत्रज्ञान स्टार्ट-अप एमएलएलच्या ‘स्मार्ट ऑटोमेशन प्रोग्राम’चा एक भाग म्हणून एकत्रित केले जातील. हे सहकार्य रिअल टाइम डिप्लॉयमेंटद्वारे कामकाज कार्यक्षमता वाढविण्यात मदत करेल आणि लॉजिस्टिक उद्योगातील भविष्यातील नवोन्मेषकांसाठी हे व्यासपीठ मजबूत करेल.

महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष श्री. आनंद महिंद्रा म्हणाले, “मला या इनक्युबेशन प्रोग्रामच्या परिणामाबद्दल खूप आशा आहे. हा एक असा उपक्रम आहे जो योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी आला आहे. याचे  कारण धोरण आणि वाढत्या उत्पादन क्षेत्राकडून असलेल्या मागणीमुळे लॉजिस्टिक क्षेत्र पुढे जात आहे. हा कार्यक्रम सर्व प्रकाशझोतात न आलेल्या नवनिर्मात्यांना त्यांच्या निर्मितीची अंमलबजावणी, व्यापारीकरण आणि पोहोच यामध्ये आणण्यास सक्षम करण्यात मदत करेल. महिंद्रा समूहात आम्ही यामुळे सर्वात लवचिक आणि कल्पक स्टार्ट-अप संस्कृती सोबत भागीदारी करण्यास सक्षम होत आहोत. त्यातून निर्माण होणारी उर्जा आम्हाला, इतर कंपन्यांना आणि राष्ट्राला लाभदायक ठरेल अशा क्षेत्रांमध्ये दिशादर्शन करते. हा एक उत्तम सहयोग संबंध आहे.”

महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रामप्रवीण स्वामिनाथन म्हणाले, ” ‘व्यापाराला गती देणे आणि समुदायांना वाढीस सक्षम बनवणे’ या आमच्या उद्देशानुसार आम्ही या कार्यक्रमाद्वारे स्टार्टअप इको-सिस्टमसोबत भागीदारी करण्यास उत्सुक आहोत. कॅटापल्टच्या या दुसर्‍या आवृत्तीसाठी गेल्या वर्षीपासून आम्ही खूप लांबचा पल्ला गाठला आहे. भारतीय पुरवठा साखळी आणि गतिशीलता क्षेत्रासाठी भविष्यासाठी लागणारे तयार तंत्रज्ञान-सक्षम सुविधा यांची सह-निर्मिती करण्यासाठी या गटातील बहुतांश भाग आमच्या इको-सिस्टममध्ये एम्बेड केला जाईल. या दुसऱ्या आवृत्तीच्या विजेत्यांसह काम करण्यास मी उत्सुक आहे आणि या वर्षाच्या अखेरीस तितक्याच रोमांचक सत्राची वाट पाहत आहे.”

कॅटापल्ट इनक्यूबेटरने लॉजिस्टिक, पुरवठा साखळी आणि गतीशीलता क्षेत्रामधील तंत्रज्ञान उपाय ओळखण्यावर लक्ष केंद्रित केले. यामध्ये तांत्रिक क्षेत्रांमध्ये पुढील क्षेत्रांचा समावेश होता:  आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), मशीन लर्निंग (एमएल), ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), रोबोटिक्स आणि ऑटोमेशन, व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर), ड्रोन, बिग डेटा आणि अॅनालिटिक्स , कमी किमतीचे हार्डवेअर/ कनेक्टिव्हिटी/ जीपीएस  आधारित सोल्यूशन्स आणि ई मोबिलिटी सोल्यूशन्स. कॅटापल्टसाठी आतापर्यंत एकूण १०००  स्टार्ट-अप्सनी नोंदणी केली आहे.