बेपत्ता मुले 3 तासात घरी सुखरूप पोच

83

आटपाडी : सोमवार रोजी सकाळच्या सुमारास हणमंत काकडे यांची मुले शुभम(वय 9 वर्षे),प्रथमेश(वय 11 वर्षे), तसेच आण्णासो काकडे यांची ओंकार (वय 11 वर्षे),अथर्व (वय 9 वर्षे), ही मुले व्यायाम करण्यासाठी घरा बाहेर गेली आणि अचानक बेपत्ता झाली.

ही बातमी ए एस आय कंकणवाडी साहेब पोलीस श्री माऊली यांचे कडून आर एस पी शिक्षक श्री प्रल्हाद जाधव सर,श्री वामन माळी सर, श्री महादेव नरळे सर तसेच पोलीस यांना समजताच यांनी काकडे वस्ती येथे धाव घेऊन शोधाशोध सुरू केली. त्यांच्या या शोधला एवढ्या 3 तासात यश आले.अवघ्या काही तासातच त्यांनी या चार मुलांचा शोध घेऊन संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या आई वडिलांना कडे सुपूर्त केले.

या घटनेत श्री प्रा. मोरे सर, श्री ए एस आय कंकणवाडी साहेब तालुका समारेशक श्री डोंबे सर ,श्री जितेंद्र कांबळे सर तसेच
पाटील नंदकुमार, शिवाजी बोते आटपाडी पोलीस स्टेशन चे निरीक्षक बजरंग कांबळे यांचे सहकार्य लाभले या कामी आर एस पी शिक्षकांचे तसेच आटपाडी पोलीस यांचे आटपाडी तालुक्यातून अभिनंदन कौतुक होत आहे.