दिवसभरातील अपडेट्स

116

देशात आजअखेर 4,00,557 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 91,16,711 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,40,355 रुग्णांचा मृत्यू


शरद पवार, सीताराम येचुरी आणि डी.राजा हे शिष्टमंडळ 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता राष्ट्रपतींना भेटणार; शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार


चीनची खुमखुमी कायम; अरुणाचलजवळ वसवली तीन गावं; उपग्रहाने टिपलेल्या फोटोंतून खुलासा


IND vs AUS: दुसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचं 195 धावांचं आव्हान भारतानं 6 विकेट्स राखून केलं पार; हार्दिक पांड्या ‘मॅन ऑफ द मॅच’


ठाकरे सरकार पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोतांचा गौप्यस्फोट; ऑपरेशन लोटससाठी अमित शाह राजस्थान काँग्रेस आमदारांना भेटल्याचाही दावा


नाशिकच्या तापमानात घट होण्यास सुरूवात; आज रविवारी 10.1 अशी किमान तापमानाची नोंद, निफाडच्या कुंदेवाडी येथे पारा 10 अंशांवर


भारतात लसीकरण सुरु करण्यास परवानगी द्या, फायझर कंपनीची केंद्र सरकारला विनंती; जागतिक लसीकरणाच्या शर्यतीत रशियाची बाजी


सोलापूर: वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातला ट्रक; जागीच झाला मृत्यू; गृहराज्यमंत्री बोलवणार उच्चस्तरीय बैठक


महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत नागरिकांनी आज शिस्तीचं आणि संयमाचं अद्भूत दर्शन घडवलं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


रावणाचं उदात्तीकरण करणारा सैफ अली खान वादाच्या भोवऱ्यात; सीताहरणासंदर्भातल्या वक्तव्यानंतर ‘बॉयकॉट आदिपुरुष’ ट्रेंडिंगमध्ये, सैफचा माफिनामा