पुणे २२ जानेवारी २०२२ : खेळाडूंचा मानसिक छळ हा हल्ली वाढलेला आहे. आज ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंना जर अशा प्रकारे सामोरे जावं लागत असेल तर इतर ठिकाणी परीस्थिती कशी असेल.. याचे दुःख मनसे शारीरिक सेना पुणे शहर अध्यक्ष निलेश काळे यांनी व्यक्त केले.
खेळाडूंनी तेव्हाच्या तेव्हा अशा कोणत्याही अन्यायकारक वागणुकीच्या विरुध्द आवाज उठवायला हवा. आपला फायदा करुन घेण्यासाठी किंवा नुकसान टाळण्यासाठी चुपचाप बसणे हे पुढच्या अनेक खेळाडूंना त्रासदायक ठरू शकते अशी शक्यता होऊ शकते असे वैयक्तिक मत त्यांनी नोंदवले.
वाईट प्रवृत्ती सर्वच क्षेत्रात असतातच. मात्र क्रीडा क्षेत्रातील अशा प्रवृत्ती संपवायला जागच्या जागी विरोध करणे आणि इतर सहकारी खेळाडूंनी सहकार्य करणे खुप महत्वाचे ठरत असते.
दोन्ही बाजूंची चौकशी व्हायलाच हवी. खेळातील राजकारण आणि राजकारणातील खेळ यांचा दोन्ही बाजुने विचार करुन खेळाडूंना तसेच संघटक आणि पदाधिकारी यांचे आरोप व खुलासे तसेच पुरावे आणि संबंधीत माहिती चा विचार करुन अशा प्रवृत्ती लवकरात लवकर संपविण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक ती कडक कारवाई करणे गरजेचे आहे असे पत्रकारांशी बोलताना निलेश काळे यांनी मत व्यक्त केले.
सर्व खेळातील खेळाडू व खेळासाठी काम करणाऱ्या अधिकृत संघटनांच्या मागे मनसे शारीरिक सेना सन्मानीय राजसाहेब ठाकरे व डॉ. ऋषि शेरेकर साहेबांच्या आदेशाने नक्की उभी राहील असे ही ते म्हणाले.