कलर्सवरील शो ‘बिग बॉस १६’मधील स्‍पर्धक निमरित कौर अहलुवालियाला एकता कपूरच्‍या ‘एलएसडी २’मध्‍ये मिळाली भूमिका

41
Colors show 'Bigg Boss 16' contestant Nimrit Kaur Ahluwalia has bagged a role in Ekta Kapoor's 'LSD 2'.

पुणे : कलर्सवरील शो ‘बिग बॉस १६’मधील स्‍पर्धक निमरित कौर अहलुवालियाला एकता कपूरच्‍या ‘एलएसडी २’मध्‍ये मिळाली भूमिका. कलर्सवरील ‘बिग बॉस १६’हा सर्वोत्तम शो आहे, जो भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रातील मानवी केमिस्‍ट्री, भावना व नात्‍यांना व्‍यापून घेतो.

प्रतिष्ठित घरामध्‍ये १६ आठवडे व्‍यतित केल्‍यानंतर स्‍पर्धकांना प्रेक्षकांचे प्रेम व लोकप्रियता मिळाली आहे. या संपूर्ण सीझनदरम्‍यान शोने स्‍पर्धकांना अधिक संधी देत घराघरामध्‍ये लोकप्रिय केले आहे.

Colors show 'Bigg Boss 16' contestant Nimrit Kaur Ahluwalia has bagged a role in Ekta Kapoor's 'LSD 2'.

निश्चितच प्रेक्षकांची मने जिंकलेल्‍या स्‍पर्धकांना मनोरंजन क्षेत्रातील पॉवरहाऊसेसकडून देखील उत्तम संधी मिळाल्‍या आहेत. चमकण्‍याची सुवर्णसंधी मिळालेली घरातील अशीच एक सदस्‍य आहे निमरित कौर अहलुवालिया.

‘वीकेण्‍ड का वार’मध्‍ये एकता कपूर व दिबाकर बॅनर्जी यांनी त्‍यांचा आगामी चित्रपट ‘एलएसडी २’ची घोषणा करण्‍यासाठी विशेष अतिथी म्‍हणून उपस्थिती दाखवत ‘बिग बॉस’घराची शोभा वाढवली. त्‍यांनी सांगितले की हा चित्रपट तीन विभिन्‍न, पण एकमेकांशी जुडलेल्‍या कथांचे संकलन असणार आहे.

अतिथी त्‍यांच्‍या आगामी प्रकल्‍पासाठी नव्‍या चेहऱ्याचा शोध घेत होते. त्‍यासाठी स्‍पर्धकांचे ऑडिशन्‍स घेण्‍यात आले, त्‍यांना कलर्सवरील लोकप्रिय शोजमधील आणि एकता कपूरचा चित्रपट ‘ड्रिम गर्ल’मधील स्‍क्रिप्‍ट देण्‍यात आले. दोघांच्‍या जोडीसह घरातील सदस्‍यांना एकता कपूर व दिबाकर बॅनर्जी यांच्‍यासमोर सीन्‍स पुन्‍हा सादर करायचे होते.

‘नागिन सीझन १’मधील निमरितच्‍या अभिनयाने प्रभावित झालेल्‍या टेलिव्हिजन व बॉलिवुडच्‍यादिग्गज एकता कपूर आणि राष्‍ट्रीय पुरस्‍कार विजेते दिबाकर बॅनर्जी यांनी निमरितला त्‍यांचा आगामी चित्रपट ‘एलएसडी २’मध्‍ये भूमिका ऑफर केली.

अधिक उत्‍साह व ड्रामासाठी पाहत राहा बिग बॉस १६पॉवर्ड बाय ट्रेसमेस्‍पेशल पार्टनर चिंग्‍स शेजवान चटणी व मेक-अप पार्टनर मायग्‍लॅम दर सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता आणि दर शनिवार व रविवार रात्री ९ वाजता फक्‍त कलर्स व वूटवर.