लेखिकानी लिहिताना स्वच्छ आणि शुद्ध लिहिले पाहिजे : डाॅ. माधवी वैद्य

आपण मराठी भाषेकडे फारशा गांभीर्याने पाहात नाही. पण परदेशातील मराठी भाषिक आपली मातृभाषा मराठी मनापासून जपतात. लेखिकानी लिहिताना स्वच्छ आणि शुद्ध लिहिले पाहिजे.लेखिकानी वाचन व्यासंग लिहिण्याचा सराव करताना आणि आधुनिक काळातील समाज माध्यम हाताळताना जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्ष डाॅ माधवी वैद्य यानी आम्ही लेखिका संस्थेच्या पुणे शाखेच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने पुणे शाखेचा शुभारंभ झाला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी आम्ही लेखिकाचे संस्थापक अध्यक्ष मोहन कुलकर्णी होते.

विशेष अतिथी म्हणून मृदुला  जोशी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होत्या.त्या म्हणाल्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील लेखिका आणि कवयित्री “आम्ही लेखिका ” च्या माध्यमातून एका व्यापक आणि भक्कम छत्राखाली एकत्र आल्या आहेत.त्याना खुले व्यासपीठ मिळाले आहे.

आम्ही लेखिका संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन कुलकर्णी यानी “आम्ही लेखिका ” ही महिला साहित्यिकांची एकमेव अखिल भारतीय संस्था आहे असे सांगितले.  पुढील वर्षी महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवी वर्षात पहिल्या अखिल भारतीय महिला साहित्य संमेलनाचे आयोजन होणार आहे.या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर व्हाटसॲप आणि फेसबुक वर ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे आवर्जून प्रतिपादन केले.

आम्ही लेखिका संस्थेच्या पुणे शाखेचा शुभारंभ देखील कल्पकतापूर्ण होता.इंदिरा संत. शांता शेळके. संत जनाबाई.पद्मा गोळे. ….  यांच्या कविता सादर करून त्याना आदरांजली वाहण्यात आली

कर्करोगाशी जिद्दीने लढा देणा-या प्रांजलाने आपली कविता सादर केली.शिलपा देशपांडे यांनी सू त्रसंचालन केले

केतकी देशपांडे यानी शारदास्तवन केले. अॅड अर्चना नार्वेकर यानी आभार मानले.

error: Content is protected !!